भाजपमधील बहुजन समाज नेत्यांचे खच्चीकरण ः कॉंग्रेस

0
111

भाजपचे सरकार बहुजन समाज आणि अल्पसंख्याक विरोधी आहे. भाजपमधील बहुजन समाजातील नेत्यांचे खच्चीकरण सुरू आहे, असा आरोप अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी केला. भाजप सरकारकडून भाजपमधील बहुजन समाजातील नेत्यांना योग्य प्रतिनिधीत्व दिले जात नाही. महामंडळ किंवा इतर निम सरकारी संस्थांवर भाजपमधील बहुजन समाजातील नेत्यांना योग्य प्रतिनिधीत्व दिले जात नाही. भाजपमधील अनेक बहुजन नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून ही व्यथा मांडली आहे. या नेत्यांनी आवाज उठविल्यास कारवाई होण्याची शक्यता असल्याने ते गप्प बसणे पसंत करीत आहेत, असेही चोडणकर यांनी सांगितले. आमदार नसतानासुध्दा सिध्दार्थ कुंकळ्येकर यांच्याकडे दोन मोठ्या महामंडळांचा कारभार सोपविण्यात आला आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशाच्या आर्थिक स्थितीची वस्तुस्थिती मांडली आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.