भाजपचा १३ रोजी ताळगावात महामेळावा

0
73

>> अमित शहांची उपस्थिती

भारतीय जनता पक्षाने येत्या १३ मे २०१८ रोजी संध्याकाळी ४ वाजता ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये मतदान केंद्र कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित केला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात राज्यातील १२ हजार कार्यकर्ते सहभागी होणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराला गती देण्याच्या उद्देशाने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष शहा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात राज्यातील १६४२ मतदार केंद्रातील कार्यकर्ते सहभागी होणार आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पोषक वातावरण आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी व्यक्त केला. भाजपचे अनेक पदाधिकारी कर्नाटक राज्यात प्रचारात सहभागी झालेले आहेत, असेही तेंडुलकर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाजपच्या माध्यम विभागाचे पदाधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांची उपस्थिती होती.