भय ‘कोरोना व्हायरस’चे

0
521
  •  डॉ. स्वाती हे. अणवेकर,
    (म्हापसा)

ह्या व्हायरसची लागण होऊन गंभीर अवस्था येण्याचे प्रसंग खूप कमी रुग्णांमध्ये आढळतात. त्यात देखील जे वृध्द आहेत तसेच जे रुग्ण आधीच कोणत्यातरी गंभीर आजाराने ग्रस्त असतील व त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झाली असेल तर अशाच रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आली आहेत.

कोरोनाव्हायरसबद्दल बरीच माहिती सोशल मिडीयावर उपलब्ध आहे. ह्यातील काही चांगल्या दर्जाची व खरी आहे तर थोडी माहिती ही खोटे व्हिडिओ, भयानक चित्रे, भयंकर व चित्त विदारक अशा खोट्या बातम्या ह्या स्वरुपात मिळते. ही अशी माहिती वाचली की आपण सारेच संभ्रमात पडतो की ह्यातील खरे काय व खोटे काय. तरी थोडेफार संशोधन व वाचन करून ह्या व्हायरसबद्दल जी माहिती मला योग्य वाटली ती मी आपल्या सर्वांसमोर ह्या लेखामधून मांडणार आहे.

कोरोना व्हायरस हा फक्त एकच व्हायरस नसून तो व्हायरसचा एक समूह आहे. ह्यामध्ये (चएठड-र्उेीं) अर्थात मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, (डAठड-र्उेीं) अर्थात सिव्हियर, ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम व हल्ली नवीन आढळून आलेला प्रकार जो पूर्वी मानव जाती मध्ये कधीच आढळून आला नाही तो नोवेल करोनाव्हायरस (पर्उेीं) किवा त्याला उजतखऊ-१९ असे देखील म्हटले जाते.

तर ह्याच उजतखऊ-१९ ह्या व्हायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. ह्या व्हायरसचा प्रसार प्रथम चीनमधील वूहान ह्या प्रांतातून झाला आहे. संपूर्ण जगात जवळ जवळ १,०२०५३ रुग्ण ह्याने बाधित असून त्यातील ३४५५ रुग्ण मृत झाले आहेत. ४०,९४४ रुग्ण अजून ह्या व्हायरसने बाधित आहेत तर ५५,८१२ रुग्ण बरे झाले आहेत व ६,२७८ रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. आणि ह्या सर्व आकडेवारीमध्ये पाहिले असता सर्वात जास्त रुग्ण फक्त चीन ह्या देशामध्येच आहेत. भारतामध्ये ह्याचे ३१ रुग्ण आढळते असून त्यामधील २८ रुग्ण अजूनही ह्या व्हायरसने प्रभावित आहेत तर ३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

आता ह्या व्हायरसची लागण ज्या व्यक्तीला होते त्याच्यामध्ये कोणकोणते लक्षणे दिसतात ते आपण जाणून घेऊयात. ह्यात सौम्य अवस्थेत नाक वाहणे, घसा दुखणे, खोकला, ताप ही लक्षणे दिसतात तर गंभीर अवस्थेत त्या रुग्णाला न्युमोनिया होतो व त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. ह्या व्हायरसची लागण होऊन गंभीर अवस्था येण्याचे प्रसंग खूप कमी रुग्णांमध्ये आढळतात. त्यात देखील जे वृध्द आहेत तसेच जे रुग्ण आधीच कोणत्यातरी गंभीर आजाराने ग्रस्त असतील व त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झाली असेल तर अशाच रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आली आहेत व मृत्यूचे प्रमाण देखील अशाच रुग्णांमध्ये अधिक आढळून आले आहे.

आता ह्या व्हायरसचा प्रसार कसा होतो ते पाहणे देखील आवश्यक ठरते. ह्याचा प्रसार हा ऊीेश्रिशीं खपषशलींळेप द्वारे होतो. अर्थात जर एखादी व्यक्ती कोरोना व्हायरसने बाधित असेल व ती शिंकली अथवा खोकली असता त्याच्या कफाचा संपर्क निरोगी व्यक्तीला आला व थुंकीमधील हा व्हायरस त्या व्यक्तीच्या नाक, डोळे, तोंड ह्यांच्या श्लेष्मल कलेच्या संपर्कात आला तर त्या व्यक्तिलादेखील ह्या व्हायरसची लागण होऊ शकते. त्याचप्रमाणे जर एखादा रुग्ण शिंकला अथवा खोकला व त्याच्या कफाचे शिंतोडे टेबल, खुर्ची अथवा फरशीवर पडले व ते साफ न करता तिथे तसेच राहिले तरी हा व्हायरस त्या सुकलेल्या थुंकितसुद्धा त्या जागी काही दिवस जिवंत राहतो व जर अशा टेबल-खुर्ची-फरशी ह्याला आपण हात लाऊन तो हात डोळे, तोंड नाक ह्याला लावला तरीही आपल्याला ह्या व्हायरसची लागण होऊ शकते.

ह्या व्हायरसचे संक्रमण फक्त लक्षण सुरु झालेल्या रुग्णामार्फतच होते. जर एखाद्या व्यक्तीचा व्याधी खपर्लीलरींळेप काळात असेल व त्याला कोणतीही लक्षणे नसतील तर त्याव्यक्तीमार्फत ह्या व्हायरसचा प्रसार सहसा होत नाही.

आता ह्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण कोणकोणती काळजी घ्यावी ते पाहूया:
१) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
२) गरज नसताना प्रवास टाळावा.
३) नियमित हात पाय तोंड स्वच्छ धुवून मगच वस्तू हाताळाव्यात.
४) चेहर्‍याला वारंवार स्पर्श करू नये.
५) थंड पदार्थ, हॉटेलमधील पदार्थ खाणे टाळावे.
६) पैसे देताना घेताना काळजी बाळगावी. पैसे हाताळून तोच हात तोंडात घालू नये.
७) नियमित सोबत साबण व करपव डरपळींळूशी बाळगावा.
८) एखाद्या व्यक्तीला ग्रीट करताना अथवा त्याचे स्वागत करताना हस्तांदोलन, मिठी मारणे ह्या प्रथा कमी करून नमस्कार करूनच त्यांना अभिवादन करावे हे सर्वात सुरक्षित आहे.
९) ज्या व्यक्तींना ह्या व्हायरसची लागण झाली आहे अथवा ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांनी निश्चितच फेस मास्क वापरून दुसर्‍याना आपल्यापासून होणारे संक्रमण टाळावे.
ह्या व्हायरसबद्दल ऐकल्यापासून औषधालयांमध्ये फेस मास्क चा खप खूपच वाढला आहे आणि प्रत्येक जण हे मास्क खरेदी करून वापरत आहे. पण निरोगी व्यक्तीने मास्क वापरायची गरज नाही. हो जर आपण गर्दीच्या ठिकाणी जात असलात तर तो वापरायला हरकत नाही. पण निरोगी व्यक्तीने विनाकारण मास्क वापरल्याने काहीच फायदा नाही, कारण ज्या व्यक्ती कोरोना बाधित आहेत त्यांनीच तो वापरणे प्रसार टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. कारण ऊीेश्रिशीं ळपषशलींळेप द्वारे ह्याचा प्रसार ह्या रुग्णांमार्फत होत असतो.
दुसरा भ्रम व भीती लोकांमध्ये अशी आहे की कुणालाही सर्दी खोकला ताप आला असेल तर आपल्याला असे वाटते की ह्याला कोरोना व्हायरस झाला आहे. पण हे असे समजणे चुकीचे आहे, कारण त्यासाठी योग्य त्या रक्ताच्या, त्यांच्या नाकातील श्लेष्मल कलेची तपासणी अथवा तोंडातील कफाची तपासणी करूनच ह्याचे निदान होते की त्या व्यक्तीला खरोखरच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे अथवा नाही ते.

जरी उजतखऊ-१९ हा व्हायरस डAठड व एइजङA व्हायरसपेक्षा जास्त लवकर प्रसार पावणारा असला तरीदेखील एइजङA व डAठड पेक्षा नक्कीच हा कमी घातक आहे कारण डAठड व इबोलाचा मृत्युदर ह्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. तसेच हा व्हायरस उष्ण वातावरणात जास्त काळ जिवंत राहत नाही अर्थात २६-२७ डिग्री तापमानात हा व्हायरस लगेच मरण पावतो. त्यामुळे भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात ह्याचा प्रसार झपाट्याने होण्याचा धोका तसा संभवत नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीने गरम पाणी अथवा पेय प्यावे, उष्ण उबदार जागेत राहावे. तसेच थंड पेय व थंड वातावरणात राहणे टाळावे.

आता आयुर्वेदानुसार ह्यावर कोणते उपाय होऊ शकतात हे देखील जाणून घेऊया. आयुर्वेदानुसार संक्रमण झालेल्या व्यक्तीने पुढील काळजी घ्यावी :
१) अति प्रवास, दगदग टाळावी.
२) आराम करावा.
३) मांसाहार, दुध व दुधाचे पदार्थ, जड पदार्थ, शिळे फ्रिजमधील अन्न खाणे टाळावे.
४) ताजे, गरम, हलके सुपाच्य घरी बनवलेले शाकाहारी अन्न त्याने घ्यावे.
५) नियमित गरम पाणी प्यावे.
ह्या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तींना रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे वैद्य देतात जसे गुळवेल, अश्वगंधा, शतावरी, हळद, सुंठ, आले, पिंपळी इ.
त्याचप्रमाणे अडुळसा, आले, तुळस, जेष्ठमध, गुळवेल ह्यांचा काढादेखील उत्तम आहे. जेव्हा रोगाची अवस्था तीव्र असते तेव्हा महासुदर्शन काढा, लक्ष्मीविलास रस, संशमनी वटी, त्रिभुवन कीर्ती रस इ औषधे उपयुक्त ठरतात तर रुग्ण बरा झाल्यावर त्याला अमृतारीष्ट, कुमारीआसव, द्राक्षासव, अश्वगन्धारीष्ट, शतावरी कल्प, च्यवनप्राश, लघु मालिनी वसंत, मधु मालिनी वसंत, सुवर्ण मालिनी वसंत इ औषधांचा वापर फायदेशीर ठरतो.
(कृपया वरील उपचार हे फक्त वाचकांच्या माहितीसाठी असून त्याचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा).