ब्राझिलसमोर बेल्जियमचे आव्हान

0
110

रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा जेदेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ब्राझिलची लढत जागतिक तिसर्‍या स्थानावरील बेल्जियमशी होणार आहे. जागतिक दुसर्‍या स्थानी असलेल्या ब्राझिलने गट फेरीत चकमदार कामगिरी केलेल्या मेक्सिकोवर मात करीत अंतिम आठ संघातील आपले स्थान निश्‍चित केलेले आहे. तर बेल्जियमने आशियाई संघ जपानचे आव्हान मोडित काढत ब्राझिलविरुद्धची उपांत्यपूर्व लढत पक्की केली होती. ब्राझीलची मदार त्यांचा स्टार खेळाडू नेमारवर अवलंबून आहे. त्याला पॉलिन्यो, कार्लेस कॅसेमिरो, फिलीप कुतिन्हो यांची साथ मिळाली तर ब्राझिलियन संघ सहज बेल्जियमला पाणी पाजू शकता.

त्यातच मार्सेलो संघात परतणार असल्याने ब्राझिलसाठी ती एक जमेची बाजू ठरणार आहे. मार्सेलो व डग्लस कॉस्ताने काल सरावात सहभाग घेतला. तर बेल्जियमच्या संघात एडीन हॅजार्ड, रोमेलू लुकाकू, ड्राइज मर्टनि व एक्सल विटसेल यांच्यासारखे खेळाडू आहेत, जे ब्राझिलसाठी धोकायदायक ठरू शकतात. परंतु मेक्सिकोविरुद्ध केलेला खेळ पाहिल्यास ब्राझिलचा संघ बेल्जियमपेक्षा वरचढ दिसून येत आहे. दोन्ही संघादरम्यानची ही पाचवी लढत असेल. बेल्यिजमने १९६३मध्ये मित्रत्वाचा सामना जिंकला होता. तर त्यानंतर तीनही लढतीत ब्राझिलने बाजी मारली होती.