बोडगेश्वर फुगडी मंडळ राज्यात अव्वल

0
277
श्री देव बोडगेश्वर फुगडी मंडळ.

पेडणे (न. प्र.)
लोककला सादर करून राज्यात हमखास प्रथम व दुसरे पारितोषिक पटकावणारे श्री देव बोडगेश्वर फुगडी मंडळ सध्या राज्यातील एक आघाडीचे युवा फुगडी मंडळ म्हणून नावारूपास येत आहे.
राज्यात ज्या ज्या ठिकाणी अखिल गोवा फुगडी स्पर्धा झाली त्यात या मंडळाने सहभागी होवून प्रथम क्रमांकही खेचून आणण्याची किमया केली आहे. हे एक युवा मंडळ असून यातील कलाकार आपले शिक्षण करूनही लोकसंकृतीचे जपण्यासाठी झटत आहेत. नुकतेच फोंडा आर्ल, केरी येथील श्री लक्ष्मीनारायण कला मंचाने आयोजित केलेल्या अखिल गोवा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस, कासारवर्णे पेडणे येथील स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. शिवाय गणेशोत्सवात बेतुल, पर्वरी, गणेशपुरी, पर्रा, प्रियोळ, कुचेली याठिकाणी प्रथम क्रमांकाचे तर कामुर्ली, दुसरे आणि मेरशी व चांदेल येथे तिसरे बक्षीस पटकावून राज्यात आघाडीचे युवा फुगडी मंडळ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला आहे.
श्री देव बोडगेश्वर फुगडी मंडळात, दक्षिता साळगावकर, सनीला साळगावकर, दिव्या साळगावकर, स्नेहा साळगावकर, अंकिता साळगावकर, प्रीती परब, विभा पार्सेकर, श्रुती नाईक आरोंदेकर, प्रणीता शिरगावकर, पल्लवी गोलतकर, सिद्धी सावंत व प्राची सावंत या अकरा युवा महिला कलाकारांनी राज्यभर अल्पकाळात आपले नाव अजरामर केले आहे.