बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बाबू कवळेकरांना समन्स

0
130

भ्रष्टाचार विरोधी शाखेने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशीसाठी विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांना आज दि. ५ रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला आहे.

विरोधी पक्षनेते कवळेकर यांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाची गेली कित्येक वर्षे चौकशी सुरू आहे. कवळेकर यांच्याकडे ४.७८ कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. एसीबीच्या एका पथकाने काही महिन्यांपूर्वी कवळेकर यांच्या केपे येथील निवासस्थान आणि मडगाव येथील कार्यालयाची झडती घेतली होती. त्यावेळी केपे येथील घरातील एका खोलीत मटक्याशी संबंधित साहित्य आढळून आले होते. त्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने मटका प्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती.