बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कुंकळ्येकरांविरोधात तक्रार

0
149

ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी भ्रष्टाचार विरोधी शाखेकडे भाजपचे पणजी पोट निवडणुकीतील उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तक्रार काल दाखल केली आहे.

भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात २६० एकर जमीन विकत घेतली आहे. ही जमीन सात कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. कुंकळ्येकर ईडीसी, जीएसआयडीसी आणि स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर कार्यरत होते. त्यामुळे जमीन खरेदीच्या दराबाबत संशय निर्माण होत आहे. जमीन खरेदीसंबंधी दोडामार्ग येथे सरकारी पातळीवर व्यवहार करण्यात आला आहे. एसीबीने या मालमत्ता खरेदी प्रकरणी त्वरित चौकशी सुरू करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.