बेल्जियमची इंग्लंडवर मात; गटात अव्वल

0
100

अदनान जानुझाजने दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर बेल्जियमने जेतेपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या इंग्लंडला गटफेरीतील शेवटच्या सामन्यात पराभवाचा धक्का देत आपल्या सलग तिसर्‍या विजयासह ९ गुणांसह विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘जी’ गटात अव्वल स्थान मिळविले. ६ गुण मिळविलेल्या इंग्लंडला दुसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले.

आता बाद फेरीत इंग्लंडचा सामना ३ जुलै रोजी कोलंबियाशी तर बेल्जियम संघ २ जुलै रोजी आशियाई संघ जपानशी लढेल.
ट्युनेशिया व पनामा दोन्ही संघ स्पर्धेबाहेर फेकले गेल्याने कोलंबिया व इंग्लंड संघांनी बाद फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला होता. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा खेळविण्यात आलेला हा सामना म्हणजे गटात अव्वल स्थानासाठीच्या संघर्षाचा होता आणि त्यात बेल्जियमने सर्वांना अनपेक्षित धक्का देत बाजी मारली.
पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिले होते. तर दुसर्‍या सत्रात ५१व्या मिनिटाला मध्यपटू अदनान जानुझाजने ५१ व्या मिनिटाला गोल नोंदवित बेल्जियमच्या विजयामवर शिक्कामोर्तब करतानाच गटात अग्रस्थान मिळविले.