बेंगळुरूला मागे टाकण्याचा चेन्नईनचा निर्धार

0
116

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये मंगळवारी चेन्नईन एफसीचा सामना नॉर्थईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध होत आहे. ही लढत जिंकून बेंगळूरु एफसी संघाला मागे टाकून तिसरे स्थान मिळवण्याचा चेन्नईनचा निर्धार असेल.

या निकालावर साखळीचा अंतिम गुणतक्ता आणि बाद फेरीचे वेळापत्रक अवलंबून असेल. चेन्नईन सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे २८ गुण आहेत. बेंगळुरूपेक्षा ते दोन गुणांनी मागे आहेत.
बरोबरी झाली किंवा हरल्यास चेन्नईन संघाला आघाडीवरील एफसी गोवा विरुद्ध खेळावे लागेल. येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर जिंकल्यास त्यांना दुसर्‍या क्रमांकावरील एटीके विरूद्ध खेळावे लागेल. उपांत्य फेरी दोन सामन्यांची असेल.

ओवेन कॉयल यांच्या डावपेचांवर बरेच काही अवलंबून असेल. ते नवोदित खेळाडूंना संधी देणार का हे महत्त्वाचे असेल. ल्यूचीयन गोएन, रॅफेल क्रीव्हेलारो आणि नेरीयुस वॅल्सकीस या तिघांना तीन पिवळी कार्ड मिळाली आहेत. आणखी एक असे कार्ड मिळाले तर त्यांना उपांत्य फेरी मधील पहिल्या लढतीला मुकावे लागेल. त्यामुळे ओवेन मंगळवारी त्यांना खेळवून धोका स्वीकारतील अशी शक्यता कमी आहे.

उद्या रहीम अली, करणजीत सिंग, दीपक तांग्री आणि एैमोल रिमसोचुंग अशा खेळाडूंना संधी मिळू शकते. ते चांगले खेळले तर बाद फेरीपूर्वी ओवेन यांच्यासमोर संघ निवडताना पेच निर्माण होईल.
नॉर्थईस्ट समोर वेगळ्याच समस्या आहेत. मागील आठवड्यात त्यांना हैदराबाद विरूद्ध १-५ असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. आता घरच्या प्रेक्षकांसमोर भरपाई करून मोसमाची सांगता चांगली करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
नॉर्थईस्टसाठी मोसम निराशाजनक ठरला. चांगली सुरवात झाल्यावर ते सातत्य राखू शकले नाहीत. असमोह ग्यान, काही हिरींग्ज अशा प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे त्यांचा संघ पिछाडीवर