बुद्धिबळात पार्थ कामतला प्रथम क्रमांक

0
138

‘जीव्हीएम’च्या सावईवेरे येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील मुलामुलींसाठी फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेने (पीटीसीए) आयोजित केलेली बुद्धिबळ स्पर्धा पार्थ कामत याने जिंकली. या स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे मुख्य लवाद म्हणून आनंद कुर्टीकर यांनी काम पाहिले. ध्रुव जगताप, रोहित भारद्वाज, सौरीश हळदणकर व उद्धव मडगावकर यांनी अनुक्रमे दुसरा ते पाचवा क्रमांक मिळविला. ‘पीटीसीए’चे अध्यक्ष अमोघ नमशीकर, सचिव आनंद कुर्टीकर, खजिनदार महेश खेडेकर, जीव्हीएमच्या कृष्णा रघुनाथ शेट्ये सावईकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतीमा पारकर, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख शर्मिला अभिषेकी आदींच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. दीपश्री भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. करिष्मा नाईक यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यात शांतेश वेरेकर तसेच महेश खेडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.