बियरीश एन्गल्फिंग पॅटर्न…

0
122

सुधाकर ना. गावडे (सी. ए.)

जेव्हा मार्केट तेजीत असते तेव्हा ते वर वर जात असते. एखाद्या विशिष्ट पातळीवर गेल्यावर जेव्हा आपल्याला बियरीश एन्गल्फिंग पॅटर्न दिसतो तेव्हा तो मार्केटचा ट्रेंड बदलणार याचा संकेत देतो. अशा वेळी आपल्याकडे असलेल्या शेअर्सना विकून फायदा कमवून द्यायचा असतो.

मित्रहो, आज आपण बियरीश एन्गल्फिंग म्हणजे काय… हे समजून घेऊ. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच शेअर मार्केटमध्ये नफा/नुकसान, तेजी/मंदी अशा बाजू असतात. मार्केटमध्ये सतत तेजी किंवा सतत मंदी असू शकत नाही. समजा मार्केटचा प्राथमिक कल (प्रायमरी ट्रेंड) तेजीत असेल तर साहजिकच त्याचा सेकंडरी ट्रेंड (माध्यमिक कल) मंदी दाखवील. कारण आपण शेअर खरेदी केले की फायदा पदरात पाडून घेण्यासाठी आपण ते विकतो. तेव्हा अशा प्रॉफिट बाउंडिंगमुळे मार्केटचा सेकंडरी ट्रेन्ड मंदी दाखवू शकतो. आता वर गेलेले मार्केट खाली कसे येईल, ते आपल्याला कळू शकते का? हो! आपल्याला नक्की कळू शकते. बियरीश एन्गल्फिंग पॅटर्न आपल्याला मार्केट खाली येणार याचे आधीच संकेत देत असतो. जेव्हा मार्केट तेजीत असते तेव्हा ते वर वर जात असते. एखाद्या विशिष्ट पातळीवर गेल्यावर जेव्हा आपल्याला बियरीश एन्गल्फिंग पॅटर्न दिसतो तेव्हा तो मार्केटचा ट्रेंड बदलणार याचा संकेत देतो. अशा वेळी आपल्याकडे असलेल्या शेअर्सना विकून फायदा कमवून द्यायचा असतो.
जेव्हा मार्केट तेजीमध्ये एका विशिष्ट पातळीवर पोचते व ग्रीन कँडलला रेड कँडल पूर्णपणे झाकोळून टाकते त्याला बियरीश एन्गल्फिंग पॅटर्न म्हणतात. खालील छायाचित्रात हा पॅटर्न दाखवला आहे.
बियरीश एन्गल्फिंग चार्टवर कसा दिसतो व तो ओळखता यावा यासाठी खालील छायाचित्रात जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये एक आडवी ओळ आहे, त्या ओळीच्या गोलाकारामध्ये जो पॅटर्न दिसतो आहे तो बियरीश एन्गल्फिंग पॅटर्न आहे. त्या पॅटर्ननंतर मार्केट खाली आहे. तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला र्ींळपेवरिींशऽूरहेे.लेा या पत्त्यावर जरूर कळवा.