बारावीची परीक्षा आजपासून

0
152

गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा सोमवार ५ मार्चपासून सुरू होत असून ती २६ मार्च पर्यंत चालणार आहे. यंदा १८५०२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

बारावीची परीक्षा डिचोली, काणकोण, कुंकळ्ळी, कुडचडे, म्हापसा, मडगाव, पणजी, हरमल, पेडणे, पीलार, फोंडा, फर्मागुडी, वास्को, नावेली, पर्वरी, साखळी या केंद्रातून घेतली जाणार आहे. मंडळातर्फे प्रत्येक केंद्रासाठी उपकेंद्रे व आसन व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर कोणताही प्रकारचा ताण येऊ नये म्हणून एका पेपरनंतर दुसर्‍या पेपरची तयारी करण्यासाठी चांगला वेळ मिळेल अशा पद्धतीने परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या मुलांची परीक्षा ५ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. व्यावसायिक शाखेची परीक्षा ६ ते १७ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच बारावी परीक्षेला बसणार्‍या विशेष मुलांची परीक्षा ६ ते १७ दरम्यान घेण्यात येणार आहे, असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा ही परीक्षा २ ते २१ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे.

राज्यातील विविध केंद्रांतून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. २ ते १२ एप्रिल पर्यंत नियमित व व्यावसायिक विषयांची परीक्षा होणार आहे. १३ ते २१ दरम्यान एनएसक्यूफ, सीडब्लूएसएन विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. नियमित व इतर विषयांची परीक्षा ठरलेल्या वेळेत घेतली जाणार आहे. नियमित विषयांची परीक्षा सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. २ रोजी – प्रथम भाषा, ३ रोजी – फ्लोरिकल्चर, ४ रोजी – गणित, ५ रोजी – द्वितीय भाषा, ६ रोजी – व्यावसायिक, ७ रोजी – सोशल सायन्स पेपर – १, ९ रोजी – सोशल सायन्स पेपर – २, १० रोजी – व्यावसायिक, ११ रोजी – विज्ञान, १२ रोजी – तृतीय भाषा विषयाचा पेपर होणार आहे.