बारामुल्लात ‘जैश’च्या कमांडरचा खात्मा

0
93

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये काल भारतीय सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान उडालेल्या चकमकीत जैश ए महंमद या संघटनेचा कमांडर अबू खालिद ठार झाला. बीएसएफच्या कॅम्पवरील अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो सूत्रधार असल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर होत्या.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी वरील वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांनी गेल्या ३ ऑक्टोबर रोजी श्रीनगर विमानतळानजीकच्या बीएसएफच्या तळावर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्त्युत्तर दिले होते व तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर या हल्ल्याचा सूत्रधार अबू खलिदचा शोध पोलीस व सुरक्षा यंत्रणांकडून सुरू होता असे वैद्य यांनी सांगितले.
दरम्यान भारतीय जवान दररोज पाच-सहा दहशतवाद्यांचा खात्मा करतात असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यास तात्काळ प्रत्त्युत्तर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.