बायणा समुद्रात बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह सापडला

0
84

खोल समुद्रात मासेमारी करताना रविवारी सकाळी समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडून नंतर पाण्यात फेकल्या गेल्याने बेपत्ता असलेल्या श्रीकांत यादव (२५) या मच्छीमाराचा मृतदेह काल बायणा समुद्रात खडकाळ भागात सापडला.
रविवारी समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या एक डिंगी मच्छिमारी नौकेवरील नऊ पैकी दोघे पाण्यात फेकले गेले होते. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले होते. तर श्रीकांत यादव हा मच्छीमार बेपत्ता झाला होता. वास्को पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक नेहांदा तावारीस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना काल सकाळी ११ च्या काटे, बायणा येथील समुद्राच्या खडकाळ भागात एक व्यक्ती मृतावस्थेत असल्याचे निनावी फोनद्वारे सांगण्यात आले. त्यांनी आपल्या साथीदारांसह घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी तो श्रीकांत यादव याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचनामा करून सदर मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला. याविषयी त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.