बाबू कवळेकरांचा अटकपूर्व जामिनासाठी नव्याने अर्ज

0
175

>> बेहिशेबी मालमत्ता प्रकरण

विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावरील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे.

भ्रष्टाचार विरोधी पथकाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कवळेकर यांच्याकडे साडेचार कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे एसीबीच्या तपासात आढळून आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी अटक होण्याची शक्यता असल्याने विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने कवळेकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

विरोधी पक्षनेते कवळेकर यांच्याविरोधात पणजी येथे तक्रार दाखल झालेली आहे. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण मडगाव न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याचा युक्तिवाद एसीबीच्या वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव विरोधी पक्षनेते कवळेकर यांच्या अंतरिम जामिनाची मुदत आठ दिवसांनी वाढवून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.