बाबर करू शकतो ‘त्या’पेक्षाही चांगली कामगिरी ः इंझमाम

0
224

२०१५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पाकिस्तानच्या विद्यमान मर्यादित षट्‌कांच्या कर्णधाराने आतापर्यंत शानदार कामगिरी केलेली आहे. त्याची तुलना भारताचा विद्यमान आक्रमक कर्णधार विराट कोहलीशी केली जात आहे. परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या मते बाबर अजूनही त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कामगिरीपेक्षा आणखी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो.

बाबरने आतापर्यंत खेळलेल्या २६ कसोटी सामन्यांतून १८५०, ७४ वनडेतून ३३५९ तर ३८ टी -२० लढती खेळताना १४७१ धावा बनविल्या आहेत. सध्या तोे टी-२०तील नंबर १ तर सर्व तीनही प्रकारातील अव्वल दहातील फलंदाज आहे.

इंझमामने बाबर आणि कोहली या दोन विद्यमान कर्णधारांमधील त्यांच्या सुरुवातीच्या काळातील कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यात त्याने कोहलीपेक्षा बाबर सरस असल्याचे सांगितले आहे. बाबरने २०१५साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि तो सध्याच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असल्याचे इंझमाम म्हणाला. बाबरने अवघ्या काही वर्षातच बरेच यश मिळविले असून मला विश्वास आहे की तो यापेक्षाही सरस कामगिरी करेल, असे इंझमामने त्याची स्तुती करताना सांगितले. कोहली दहा वर्षे खेळत आहे, तर बाबर गेली तीन-चार वर्षे पाकिस्तानी संघात आहे. परंतु जर तुम्ही बाबर आणि कोहलीच्या सुरुवातीच्या दिवसांची तुलना केली तर तुम्हाला बाबर असल्याचे दिसून येईल.

त्याच बरोबर इंझमामने बाबरकडे लांब काळासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याचे आवाहनही केले आहे.