बांधकाम खात्यातील १११५ कामगारांचा सोसायटीत समावेश

0
231

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटदारांच्या हाताखाली अनेक वर्षे काम करणार्‍या १११५ कामगारांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामगार सोसायटीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या १११५ कामगारांना सोसायटीमध्ये समावेशाबाबतची नियुक्ती पत्रे एका कार्यक्रमात काल देण्यात आली.

कंत्राटदारांच्या हाताखाली काम करणार्‍या कामगारांचा पीडब्ल्यूडीच्या कामगार सोसायटीमध्ये समावेशामुळे वार्षिक सात कोटी रुपयांची बचत होणार आहे. या कामगारांना आता वेळेवर पगार व इतर सुविधांचा लाभ मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, प्रभारी मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, पीडब्ल्यूडीचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर उपस्थिती होते. सरकारने पीडब्ल्यूडीमधील कंत्राटी कामगार पद्धत मार्च २०२० पासून रद्दबातल केली आहे. पीडब्लूडी कामगार सोसायटीमध्ये नव्याने समाविष्ट कर्मचार्‍यांमध्ये कुशल २६८, अकुशल ४५८, अर्धकुशल ३७८ कामगारांचा तसेच ११ वाहन चालकांचा समावेश आहे. या कामगारांनी कंत्राटदारांच्या हाताखाली १० ते १२ वर्षे काम केलेले आहे.