बांडोळी-धारबांदोड्यात चुलत भावाचा खून

0
243

दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीनंतर आपल्याच चुलतभावाला विस्तव पेटवण्यासाठी वापरल्या जाणारी फुंकणी डोक्यावर वार करून खून केला. धारबंदोडा तालुक्यातील बांडोळी गावाच्या मैसाळ येथील क्रशरवर हा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. यात दिलीप पीयूष केरकेटा (२४) याचा मृत्यू झाला असून हा खून संशयित अजितकुमार केरकेटा (३०) याने केला. या घटनेनंतर अजितकुमार हा मैसाळ येथील घनदाट जंगलात लापूल बसला होता पण हे प्रकरण उघडकिला येण्याच्या बारा तासांच्या आत कुडचडे पोलिसांनी जंगलात शोध मोहीम राबवत काल सोमवारी संध्याकाळी अजितकुमार याला ताब्यात घेतले.

मैसाळच्या घनदाट जंगलात सुरू गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दगडांच्या खाणीवर मूळ झारखंडमधील जिलिंगा गावाचे रहिवाशी असलेले अजितकुमार, दिलीप व त्यांचे चुलतभाऊ कामगार म्हणून आहेत. रविवारीत त्यांची सुट्टी असल्याने आठवड्याचा बाजार केला. रात्री अजितकुमार आणि दिलीप यांनी क्रशरजवळच असलेल्या त्यांच्या खोलीत भरपूर दारू ढोसली व नंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यांना इतरांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण दोघेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. दरम्यान बाचाबाचीचे पर्यवसन भांडणात होऊन संशयित अजितकुमार याने जवळच असलेल्या लोखंडी फुंकणीने दिलीपच्या डोक्यावर वार केले. यावेळी दिलीप हा तिथेच रक्तस्त्राव होऊन गतप्राण झाला. हे पाहून अजितकुमार याने मैसाळच्या जंगलात पळ काढला.

दरम्यान, सोमवारी दुपारच्या दरम्यान अजित कुमार बांडोलीच्या मैसाळ येथे घनदाट जंगलात लपून बसल्याची माहिती कुडचडे पोलीसांना मिळाली. पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी त्वरित कारवाई करत अजितकुमार याला जंगलातून ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.