बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कारवाईचे राज्यपालांचे पत्र

0
177

उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे पुत्र रेमंड फिलीप फर्नांडिस यांनी अव्वल कारकून पदासाठी अर्ज करताना बनावट पदवी प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर एफ्‌आय्‌आर नोंद करण्यात यावी, यासाठी आयरिश रॉड्रिग्ज यांनी जी तक्रार नोंदवली आहे, त्यासंबंधी योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी करणारे पत्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना लिहिले आहे.

ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी गेल्या आठवड्यात राज्यपालांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर करून बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी रेमंड फर्नांडिस यांच्यावर गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी सदर निवेदनातून केली होती. गेल्या जानेवारी महिन्यात अव्वल कारकून पदासाठी निवड झालेल्या १६ उमेदवारांमध्ये रेमंड फर्नांडिस यांचा समावेश होता.

आयरिश रॉड्रिग्ज यांनी केलेल्या तक्रारीनंतर रेमंड फर्नांडिस यांच्या पदवी प्रमाणपत्राविषयी चौकशी सुरू झाली होती व चौकशीत त्यांचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.