बंदूक संस्कृतीचे बळी…

0
220
  • शैलेंद्र देवळाणकर

लास वेगासमध्ये झालेला हल्ला हा अमेरिकेच्या इतिहासातील बंदुकीचा वापर करून झालेला सर्वांत भीषण हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली असली तरी मूळ प्रश्‍न अमेरिकेतील गन कल्चरचा आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठा पर्यटकांचा राबता असणार्‍या आणि गॅम्बलिंग सिटी नावाने ओळखल्या जाणार्‍या लास वेगास या शहरामध्ये नुकताच भीषण हल्ला झाला. या शहरात एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान स्टिङ्गन पॅडॉक नावाच्या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. मशीनगनच्या माध्यमातून झालेल्या या बेछूट गोळीबारामध्य ५८ लोक ठार झाले असून ५५० लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेत बंदुकीच्या माध्यमातून झालेला हा सर्वांत भीषण हल्ला मानला जात आहे. २००१ मध्ये अमेरिकेमधील ट्विन टॉवर्सवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर गेल्या १६ वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण ९३ लोक मारले गेले. पण लास वेगासच्या एकाच हल्ल्यात ५८ जण मारले गेले आहेत. त्याचबरोबर हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही आहे. हल्लेखोर पॅडॉक याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे ह्या हल्ल्यामागे नेमका काय उद्देश होता हे समजणे कठीण झाले आहे. अमेरिकन पोलिस आणि गुप्तहेर संघटना त्याचा छडा लावत आहेत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार या हल्लेखोराचे वय ६४ वर्ष होते आणि काही दिवसांपूर्वीच त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता असेही सांगितले जाते.

अलीकडील काळात युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. या हल्ल्यांचे रूप पाहिले तर त्यातील बहुतांश घटनांमध्ये एखादा व्यक्ती हल्ला करीत असल्याचे दिसून आले आहे. ट्रक घुसवणे, गोळीबार करणे या माध्यमातून एकाच व्यक्तीकडून हल्ले केले जातात. हे हल्ले मूलतत्ववादी विचारांनी प्रभावित झालेल्या व्यक्ती करीत असल्याचे दिसून आले आहे. इस्लामिक स्टेट किंवा आयसिस ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आणि त्यांच्या विखारी प्रचाराला बळी पडून युरोपात असे हल्ले अनेक झाले आहेत. त्यामुळे हा एक प्रकारचा प्रवाह म्हणून समोर येत आहे. यापूर्वी अशा प्रकारे सांगितिक कार्यक्रमांमध्ये हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २२ मे २०१७ रोजी इंग्लंडमध्ये मॅचेस्टरमध्ये अशाच प्रकारच्या संगीत कार्यक्रमादरम्यान दहशतवादी हल्ला झाला होता. गेल्या वर्षी १ ऑक्टोबरला मध्यरात्री पॅरीसमध्येही ट्रकचा वापर करून असाच हल्ला झाला होता. कॅनडामध्येही तोच प्रकार दिसून आला होता. गर्दीच्या ठिकाणी हजारो लोक एकत्र येतात हे हेरून दहशतवाद्यांकडून ते ठिकाण लक्ष्य केले जाते. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे आव्हान युरोप आणि अमेरिका या दोघांसमोरही आहे, मात्र दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर हल्ल्यासाठी केला जातोे. युरोपात ट्रक, मोठ्या गाड्यांचा वापर हत्या करण्यासाठी वापर केला गेला कारण युरोपात वाहने सहज उपलब्ध होतात; तर अमेरिकेत शस्त्रांचा वापर केला जात आहे, कारण तेथे शस्त्रास्त्रे सहजपणे उपलब्ध होतात. दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीत हा महत्त्वाचा ङ्गरक दिसून येतो.

लास वेगासमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिस किंवा इस्लामिक स्टेटने घेतली आहे. पॅडॉक हा या संघटनेशी बांधिलकी असणारा होता आणि त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता, असे आयसिसने जाहीर केले आहे. परंतु सीआयएने या हल्ल्याचा दहशतवादी संघटनांशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याचा दहशतवादी संघटना किंवा आयसिसशी संबंध आहे की नाही याची विस्तृत चौकशी होईल. पण यामधून महत्त्वाची बाब समोर येेते ती म्हणजे अमेरिकेतील गन कल्चर. ङ्गोङ्गावलेल्या बंदूक संस्कृतीचे हे बळी आहेत.

अमेरिकेत शस्त्रास्त्रे सहजपणाने मिळतात, तसेच ती जवळ बाळगताही येतात. बंदूक मिळवण्यासाठीचा परवाना अमेरिकेत सहजपणे उपलब्ध होतो. सध्या अमेरिकेत जवळपास ३० कोटी बंदुका आहेत आणि अमेरिकेची लोकसंख्या आहे तीस कोटी. म्हणजे व्यक्तीगणिक शस्त्र असे सरासरी प्रमाण आहे. ह्या बंदूक संस्कृतीचा जन्म अमेरिकेच्या जन्माबरोबरच झाला. अमेरिका संघराज्य म्हणून अस्तित्वात आले, त्यानंतर काही काळ तेथे स्वतःचे लष्कर नव्हते. पोलिस यंत्रणा विकसित झाली नव्हती. तेव्हा दरोडेखोरांचे प्राबल्य होते. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार देण्यात आला. आज २०० वर्षांनंतरही अमेरिकेतील हा अधिकार कायम ठेवण्यात आला आहे. या कालावधीत अमेरिकेत ङ्गार मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत, पण अमेरिकन संस्कृतीचे ङ्गार मोठे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्याला दिले जाणारे अतिरेकी महत्त्व. तेथे असणारे व्यक्तीस्वातंंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे जगण्याच्या अधिकाराशी गन कल्चरचा संबंध जोडला गेला.

शस्त्रास्त्र बाळगण्याच्या या अधिकारावर नियंत्रण आणण्यासाठी अमरिकेच्या प्रशासनाने गेल्या ७० वर्षांत अनेक प्रयत्न केले; पण ते विङ्गल ठरलेले आहेत. कारण अमेरिकन जनमत त्याच्या विरोधात आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार केवळ ४४ टक्के लोकांना गन कल्चरवर निर्बंध आणावे असे वाटते. त्यामुळे ज्या सरकारांनी याबाबत प्रयत्न केले त्यांना अयशस्वी व्हावे लागलेे. अमेरिकेत ज्या सहजपणे बंदुका उपलब्ध होतात त्यामुळे हिंसाचाराच्या घटना सहजपणे घडतात. २०१७ मध्ये अमेरिकेत ४६ हजार छोट्या मोठ्या बंदूक हल्ल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये १८ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या दशकात गन हल्ल्यांमध्ये ३१ हजार लोकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे बंदूक संस्कृतीवर नियंत्रण आणावे की नाही आणि कशा पद्धतीने आणावे यावर अमेरिकेत सातत्याने चर्चा होत असते. मागील काळात महाविद्यालये, शाळा इथेही विद्यार्थ्यांनी बेछूट गोळीबार, हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणजेच तरुण पिढीवरही या बंदूकसंस्कृतीचा परिणाम झालेला दिसतो.

अतार्किक विचार, टोकाचे व्यक्तीस्वातंत्र्य, बंदुकसंस्कृती यामुळे अशा घटना वाढत चालल्या आहेत. पॅडॉकने हा हल्ला केला असला आणि तो आयसिसचा कार्यकर्ता होता हे सिद्ध झाले तरी अमेरिकेत वाढत चाललेल्या या हल्ल्यांचे मूळ गन कल्चरमध्ये आहे. या हल्लेखोराच्या घरात दहा बंदुका सापडल्या आहेत. त्यामुळे मूळ प्रश्‍न अमेरिका या गन कल्चरबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पॅडॉकचा संबंध आयसिसशी असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांची इस्लामिक देशांविरोधीची आक्रमक धोरणे या सर्वांना जबाबदार आहेत, कारण ट्रम्प यांनी प्रचारमोहिमांमधून इस्लामिक स्टेट हे लक्ष्य असेल आणि ते संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी इराक आणि सीरिया या देशात इस्लामिक स्टेट विरोधातील हल्ले वाढलेले आहेत आणि याचाच सूड उगवण्याचा प्रकार अशा हल्ल्यांमधून दिसून येत आहे. त्यामुळे हल्लेखोराचा संबंध प्रस्थापित झाला तरीही अमेरिकेला गन कल्चरच्या विळख्यातून मार्ग काढावाच लागेल.