बंगाल, केरळ उपांत्य फेरीत

0
100

विद्यमान विजेत्या बंगालने चंदीगडचा एकमेव गोलने तर केरळने महाराष्ट्राचा ३-० असा पराभव करत ‘अ’ गटातून ७२व्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल रविवारी हावडा मैदानावर झालेल्या लढतीत केरळकडून राहुल राज (२३वे मिनिट), जितीन एमएस (३९वे मिनिट) व राहुल केपी (५८वे मिनिट) यांनी गोल केले. केरळचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय होता. दुसरीकडे बंगालने निसटता विजय प्राप्त केला. विद्यासागर सिंगने १८व्या मिनिटाला लांब अंतरावरून मारलेला फटका चंदीगडचा कर्णधार राहुल याला लागून गोलजाळीत विसावल्याने बंगालला मोहन बागानच्या मैदानावर विजय प्राप्त करता आला. २७ रोजी केरळ व बंगाल यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता गटात अव्वल राहणार आहे.