बंगळुरू अव्वलस्थानी

0
71

इंडियन सुपर लीगमध्ये बलाढ्य बेंगळुरू एफसीने घरच्या मैदानावर एटीकेला एकमेव गोलने हरविले. येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर कर्णधार सुनील छेत्री याने पुर्वार्धात केलेला अप्रतिम गोल निर्णायक ठरला. बेंगळुरूचा हा सलग तिसरा विजय असून त्यांनी हॅट्‌ट्रिकसह आघाडी घेतली.

४०व्या मिनिटाला बेंगळुरूने आघाडी घेण्याची शर्यत जिंकली. त्यात एटीकेला मध्य फळीतील ब्रिटीश खेळाडू कॉनर थॉमस याची चूक भोवली. त्याचा पास चुकला आणि चेंडू थेट छेत्रीपाशी गेला. छेत्री तेव्हा सुमारे ३० यार्ड अंतरावर होता. त्याने वेळ दवडला असता तर संधी हुकली असती, पण परिस्थितीचा अचूक अंदाज घेत त्याने उजव्या पायाने विलक्षण किक मारत चेंडू नेटमध्ये घालविला. बंगळुरूने नऊ सामन्यांत एकूण सहावा विजय मिळविला. त्यांचे तीन पराभव झाले आहेत. सर्वाधिक १८ गुणांसह बेंगळुरूने आघाडी घेतली. बंगळुरूने तिसर्‍या क्रमांकावरून दोन क्रमांक प्रगती केली. एफसी पुणे सिटी १६ गुणांसह तिसरा आहे.