‘फ्रिगेट’चे आधुनिकीकरण

0
137

– अनंत जोशी

१९४५ नंतर अत्यंत यशस्वीरीत्या बांधलेली ङ्ग्रिगेट म्हणजे ब्रिटिश लिएंडर श्रेणीतील ङ्ग्रिगेट होय. तिचा वापर जगातील बर्‍याच नौसेनांनी केला. जवळपास या सर्व फ्रिगेट आधुनिक मारा करणार्‍या तसेच बचाव करणार्‍या यंत्रणांनी सज्ज आहेत.

आताच्या अत्याधुनिक ङ्ग्रिगेट्‌स म्हणजे अगोदरच्या ङ्ग्रिगेटचे फक्त वापरात येणारे नाव. दुसर्‍या विश्वयुद्धाच्या दरम्यान ब्रिटिश नौसेनेने ‘ङ्ग्रिगेट’ हा शब्दप्रयोग वापरात आणला. त्याचबरोबर पाणबुडीविरोधी सहायक नौका म्हणून ती ‘कॉर्वेट’पेक्षा मोठी व विद्ध्वंसिकेपेक्षा लहान होती. तसेच अमेरिकेच्या संरक्षक विद्ध्वंसिकाच्या आकाराची व आक्रमकतेशी बरोबरी करणारी होती. त्या बांधणीसाठी व वापरण्यास कमी खर्चिक होत्या.
आदल्या काळात धोलकाठीची लहान जहाजे पाणबुडीविरोधी संरक्षक जहाज म्हणून वापरात होती. १९३९-१९४५ च्या काळात हंस श्रेणीतील अशी धोलकाठी जहाजे आता असलेल्या जहाजांइतकीच मोठी व दारूगोळ्यानी परिपूर्ण होती. यांपैकी २२ युद्धनौकांना ‘ङ्ग्रिगेट’ हा दर्जा देण्यात आला.
‘कॉर्वेट’ या युद्धनौकेतील काळानुरूप येणार्‍या त्रुटी दूर करण्यासाठी, म्हणजेच मर्यादित दारुगोळा, खुल्या समुद्रात न वावरता येणारी बांधणी, एकच पंखा ज्यामुळे वेगाची मर्यादा तसेच मर्यादित हालचाल व कार्यक्षमता, यामुळे ‘ङ्ग्रिगेट’च्या निर्मितीची गरज भासू लागली. ‘ङ्ग्रिगेट’ची बांधणी व्यापारी जहाजाच्या धर्तीवर करण्यात येऊ लागली. १९४१ मध्ये रिव्हर श्रेणीतील युद्धनौकेत पहिल्यांदाच कॉर्वेटची दोन इंजिने बसविण्यात आली. तसेच आधुनिक हेजहोग ही पाणबुडीविरोधी यंत्रणाही यावर सज्ज करण्यात आली.
विद्ध्वंसिकेशी बरोबरी करता ‘ङ्ग्रिगेट’ या कमी मारा करणार्‍या ठरत होत्या. पण जेव्हा पाणबुडीविरोधी कार्यवाही करायची असेल त्यावेळेस अशा गुणाची काही आवश्यकता नव्हती. याचे मूळ कारण म्हणजे पाणबुडीचा असणारा वेग. जेव्हा पाणबुडी पाण्याखालून जाते तेव्हा तिचा वेग हा मर्यादितच असतो. त्याशिवाय जहाजावर असणारी पाणबुडी यंत्रणा ही जेव्हा जहाजाचा वेग २० सागरी मैलापेक्षा जास्त असतो त्यावेळी कुचकामी ठरते. म्हणून ङ्ग्रिगेट बांधण्याची कल्पना आली ती व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याकरिता होती. मुख्य तांड्याबरोबर जाणारी म्हणून तिची कधीच व्याख्या केली नव्हती. त्याचं मुख्य कारण म्हणजे तिचा मर्यादित वेग व पल्ला.
समकालीन जर्मन ‘एङ्ग-बोट’ या ङ्ग्रिगेट म्हणून ओळखल्या जायच्या. पण त्यांचा उपयोग सागरी सुरुंग पेरण्यासाठी, सुरुंग शोधण्यासाठी, व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी तसेच पाणबुडीविरोधी कार्यवाहीसाठी होत होता. वर्सैल्लेस करारानुसार, अधिकृतरीत्या जहाजांच्या वजनावर ६०० टनाची मर्यादा होती. पण प्रत्यक्ष पाहता ती १०० टनाने अधिक भरत होती. एङ्ग-बोट दोन १०५ मि.मी. तोङ्गांनी सज्ज होती. पण बांधणीचा आराखडा अनुकूल ठरला नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे निमुळती तुळई, तीक्ष्ण पुढील भाग, त्याचप्रमाणे बिनभरवशाचे वाङ्गेवर चालणारे इंजिन.
१९४४ मध्ये ब्रिटिश नौसेनेने ‘बे’ श्रेणीतील आराखड्याचा ङ्ग्रिगेटच्या निर्मिती तांड्यात वापरण्यासाठी उपयोग केला. पण कमी वेगाचा कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. अशा विमानवाहू नौकांविरोधी ‘ङ्ग्रिगेट’ अर्धवट अवस्थेत असलेल्या लोच श्रेणीतील ङ्ग्रिगेटच्या कण्यावर बांधण्यात आल्या. त्या अमेरिकेच्या संरक्षक विद्ध्वंसिकेच्या बरोबरीच्या होत्या, त्यामुळे मुख्य धारेतील नौकांबरोबर त्याची रवानगी करता येत होती.
समकालीन मार्गदर्शक भूमिका
दुसर्‍या विश्वयुद्धानंतर जमिनीवरून आकाशात मारा करणार्‍या क्षेपणास्त्राच्या आगमनाने तुलनात्मकरीत्या लहान असणार्‍या विमानविरोधी युद्धनौकांची ‘मार्गदर्शक क्षेपस्त्राण ङ्ग्रिगेट’ या नावाने बांधणी करण्यात येऊ लागली. अशाच नौकांचे रशियनांनी ‘गार्ड शिप’ असे नामकरण केले.
१९५०-१९७० च्या दरम्यान अमेरिकेच्या नौसेनेने काही नौका ‘मार्गदर्शक क्षेपणास्त्र ङ्ग्रिगेट’ या नावाने सेवेत रुजू केल्या. पण त्याचे जे वर्गीकरण केले होते त्यानुसार खरे पाहता त्या मार्गदर्शक क्षेपणास्त्र विद्ध्वंसिका होत्या. त्या विमानवाहूविरोधी क्रुझर्स असून त्यांची बांधणीही विद्ध्वंसिकेप्रमाणे होती. यावर एक किंवा दोन जुळी ‘रिम-२ टेरियर’ क्षेपणास्त्रे होती. त्यानंतर त्यात सुधारणा करत १९८० मध्ये ती ‘रिम- ६७’ या सुधारित आवृत्तीत आली. अशा तर्‍हेच्या युद्धनौका बनविण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, त्या विमानवाहू नौकांना नौकाविरोधी क्षेपणास्त्रांपासून बचाव करू शकतील.
१९४५ नंतर अत्यंत यशस्वीरीत्या बांधलेली ङ्ग्रिगेट म्हणजे ब्रिटिश लिएंडर श्रेणीतील ङ्ग्रिगेट होय. तिचा वापर जगातील बर्‍याच नौसेनांनी केला. जवळपास या सर्व फ्रिगेट आधुनिक मारा करणार्‍या तसेच बचाव करणार्‍या यंत्रणांनी सज्ज आहेत.