फोंड्यात भटक्या कुत्र्याकडून ११ जणांचा चावा

0
91

राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत नेहमी अनुभवाला येते. काल फोंड्यात त्याचा प्रत्यय आला. फोंड्यात काल एका भटक्या कुत्र्याने काल दिवसभरात तब्बल ११ जणांचा चावा घेतल्याने त्यांना इस्पितळात जाऊन उपचार घ्यावे लागले. यात तीन महिलांचाही समावेश होता. फोंड्यातील सपना पार्क परिसरात ही घटना घडली. फोंड्याच्या उपजिल्हा इस्पितळाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकुण ११ जणांना हा कुत्रा चावला. पैकी ८ जणांना उपचार करून घरी पाठविण्यात आले तर तिघांना अधिक उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले.