फोंडा पालिका निवडणूक २९ एप्रिल रोजीच होणार

0
124

>> स्थगिती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

फोंडा नगरपालिकेच्या २९ एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने या नगरपालिकेतील आरक्षणाविरोधातील याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर होणार आहे.

दरम्यान, फोंडा नगरपालिका क्षेत्रात शुक्रवार ६ एप्रिल पासून निवडणूक आचारसंहिता लागू होत आहे. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. निवडणूक आचारसंहिता केवळ फोंडा नगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित राहणार आहे.

फोंडा नगरपालिकेच्या १५ प्रभागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून फोंड्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६ ते १३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. यात ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. १७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम यादी जाहीर होईल.