फॅन्सी वाहन क्रमांक शुल्कात ५०% वाढ

0
123

वाहतूक खात्याने फॅन्सी वाहन क्रमांक शुल्कात ५० टक्के वाढ केली असून या निर्णयामुळे आता वाहन चालकांना पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी जास्त रक्कम फेडावी लागणार आहे. वाहतूक खात्याने फॅन्सी वाहन क्रमांकासाठीचे नवीन शुल्क अधिसूचित केले आहेत.

काही नागरिकांकडून वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक घेतला जातो. पसंतीच्या क्रमांकांसाठी शुल्क निश्‍चित करण्यात आले आहेत. वाहतूक खात्याने महसूल वाढविण्याच्या दृष्टीने वर्षभरापूर्वी वाहन कराच्या शुल्कात वाढ केली होती. आता पसंतीच्या क्रमांकाच्या शुल्कात वाढ केली आहे. वाहतूक खात्याला फॅन्सी वाहन क्रमांकाच्या माध्यमातून दरवर्षी पाच ते सहा लाखांचा महसूल मिळतो. या महसुलात आणखीन वाढ करण्यासाठी फॅन्सी वाहन क्रमांकाच्या प्रायव्हेट सिरीज आणि ट्रान्स्पोर्ट सिरीजसाठीच्या शुल्कात वाढ केली आहे.

०००१ ते ०००९ या क्रमांकासाठी प्रायव्हेट सिरीजमध्ये दुचाकी व तीनचाकी वाहनासाठी ९ हजार रुपये आणि इतर वाहनासाठी ४० हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. ट्रान्स्पोर्ट वाहनासाठी दुचाकी – तीन चाकीसाठी ४५०० रुपये आणि इतर वाहनासाठी २० हजार रुपये शुल्क भरावे लागतील.
वाहनाला ०७८६ या सारखा क्रमांक घेण्यासाठी प्रायव्हेट सिरीजमध्ये दुचाकी व तीन चाकीसाठी १५ हजार रुपये आणि इतर वाहनांसाठी ६० हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. ट्रान्स्पोर्ट सिरीजमध्ये दुचाकी व तीन चाकीसाठी ७५०० रुपये आणि ३० हजार रुपये शुल्क भरावे करावे लागतील. कुठल्याही क्रमांकाच्या आगाऊ नोंदणीसाठी दुचाकी, तीन चाकीसाठी ७ हजार रुपये आणि इतर वाहनांसाठी १५ हजार रुपये मोजावे लागतील.