फा. बिस्मार्क यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी निर्देश द्यावेत

0
127

>> मानवाधिकार आयोगाची जिल्हाधिकार्‍यांना सूचना

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी कायद्याच्या चौकटीत राहून फा. बिस्मार्क डायस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधितांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी सूचना गोवा मानवाधिकार आयोगाने केली आहे.

बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागारात फा. बिस्मार्क याचे पार्थिव ७ नोव्हेंबर २०१५ पासून पडून आहे. पार्थिव जास्त दिवस अंत्यसंस्काराविना ठेवले जाऊ शकत नाही. त्यामुळे गोवा मानवाधिकार आयोगाकडे एक याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका निकालात काढताना आयोगाने वरील निर्णय दिला आहे.

फा. बिस्मार्क यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी ३ एप्रिल २०१७ रोजी एका आदेशाद्वारे तिसवाडी गटविकास अधिकार्‍यांना स्थानिक सांतईस्तेव पंचायत आणि सांतईस्तेव चर्चच्या फादरच्या साहाय्याने बिस्मार्क यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची सूचना केली होती. त्यावेळी सांतइस्तेव चर्चच्या फादरनी कुटुंबीयांच्या ना हरकत दाखल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता.

आता मानवाधिकार आयोगाने बिस्मार्क डायस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची सूचना केली आहे. बिस्मार्क यांच्या कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यास सहकार्य केले जात नाही. अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी आयोगाला सादर केली आहे.