फर्मागुडीत कदंब-खाजगी बस अपघातात २९ जखमी

0
157

फर्मागुडी येथील सर्कलजवळ काल गुरूवारी दुपारी झालेल्या खासगी बस व कदंब बस यांच्यातील अपघातात एकूण २९ प्रवासी जखमी झाले. केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकांना अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी बाहेर काढले असून ८ जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी कदंब बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये श्रीकृष्ण बोरकर (कुर्टी), अलोक कुमार (कुर्टी), प्रकाश परब (दुर्भाट), चंपा गावडे (ओल्ड गोवा), रोमालदिना फर्नांडिस (फोंडा), जुस्तियाना रॉड्रिगीस (फोंडा), दामोदर नाईक (आडपई) व कदंब बसचालक रुपेश गावस (पाळी) या जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे. यादू कुंडईकर (ओल्ड गोवा), सर्वेश वळवईकर (वळवई), शीतल गावडे (म्हार्दोळ), रुद्र गावकर (खांडेपार), कमल गावडे (खांडेपारकर), लक्ष्मी गावकर (खांडेपार), सपतला नाईक (म्हार्दोळ), शशिकांत नाईक (भोम), संजय गुराठे (कुंडई), संजय राणे (फोंडा), रचना कवळेकर (कवळे), भारती नाईक (म्हार्दोळ), दशरथ गावडे (गुळेली), सुधा गावडे (फोंडा), डॉ. समृद्धी शेट्ये (म्हापसा), स्वरूप नाईक (आडपई), मोहनदास तारी (बांदोडा), विभव मायणेकर (धारबांदोडा), केसर गावडे (खांडेपार), वैजश्री तळेकर (बेतकी) व आयुष्य गावडे (फोंडा) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

जीए ०३ एक्स ०११४ ही कदंब बस फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होती. यावेळी फर्मागुडी येथे पोहोचताच विरुद्ध दिशेने येणार्‍या जीए ०१ डब्लू ४४६६ या खासगी बसला समोरून धडक बसली. कदंब बसचालक रुपेश गावस यांनी बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन विरुद्ध दिशेने येणार्‍या बसला ठोकर बसल्याचे सांगितले.