प्रवेश कर हटवून इंधनावरील कर वाढवण्याचा प्रस्ताव

0
87

येत्या अर्थसंकल्पाच्यावेळी राज्याच्या हद्दीवरील प्रवेशकराचा आढावा घेऊन इंधनावरील करात दोन ते तीन रुपये वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना सांगितले. इंधनाच्या करात किरकोळ वाढ करून प्रवेश शुल्क रद्द करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास महसुलावर परिणाम होणार नाही, परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही, असे ते म्हणाले. पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी राज्यातील टॅक्सींना मीटर बसविणे आवश्यक आहे. सर्व संबंधित घटकांना विश्‍वासात घेऊन पुढील वर्षभरात टॅक्सींना मीटर बसविण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मीटर नसल्यामुळे टॅक्सी व्यवसायाची बदनामी होते. शंभरातील ९५ टॅक्सीवाले चांगले असतात. बदनामी करण्यास पाच टक्केच पुरेसे असल्याचे ते म्हणाले.