प्रवासी बस-टँकर अपघातात तांबोसे येथे प्रवासी बचावले

0
145

तांबोसे, पेडणे येथे काल प्रवासी बस व पेट्रोलवाहू टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टँकरचालक व कंडक्टर गंभीर जखमी झाले. तर बसमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर अडकून पडलेल्या प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शिताङ्गीने बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल पुणे व्हाया गोवा मार्गावरील एमएच-०४-४९८३ या क्रमांकाची नाईक मुराद स्लिपर कोच प्रवासी बस ७.१५ वाजता तांबोसे येथे पोचली असता एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्‍या एमएच-०७५० या पेट्रालवाहू टँकरला तिची जोरदार धडक बसली. त्यामुळे टँकरमधील चालक मंगललाल यादव व कंडक्टर बिरींदलाल या दोघांच्या हाता-पायांना जबर मार लागला. बसची टँकरला जोरदार धडक बसल्याने अडकून पडलेल्या दोन्ही वाहानांमधील प्रवाशांनी एकच आक्रोश केला.
पेडणे अग्निशमन दलाला अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहनांचे पत्रे कापून प्रवाशांची सुखरूप सुटका केली.
अचानक काय झाले हे न कळल्याने बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. अग्निशमन दलाचे जवान पी. एन. मांद्रेकर, आर. ए. गावकर, व्ही. डी. गावकर, लक्षदीप हरमलकर, विशाल वायंगणकर, विठ्ठल परब, असोलकर आदींनी बरीच मेहनत घेऊन पत्रे कापून प्रवाशांना बाहेर काढले. बसमधील प्रवासी प्रीती परब व योगीता जनखडे किरकोळ जखमी झाले. एका प्रवासी महिलेचा हात बसच्या केबिनच्या पत्र्यात अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून प्रवाशांना सुखरूप बाहेर
काढले.
वाहनांचे पत्रे कापून
प्रवाशांना बाहेर काढले
बसची टँकरला जोरदार धडक बसल्याने अडकून पडलेल्या दोन्ही वाहानांमधील प्रवाशांनी एकच आक्रोश केला. पेडणे अग्निशमन दलाला अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहनांचे पत्रे कापून प्रवाशांची सुखरूप सुटका केली. एका प्रवासी महिलेचा हात बसच्या केबिनच्या पत्र्यात अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.