प्रमेय माईणकर भाजयुमो अध्यक्ष

0
139

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी पणजी महानगरपालिकेचे नगरसेवक प्रमेय माईणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी भाजप युवा मोर्चाची नूतन कार्यकारी समितीची काल घोषणा केली. उपाध्यक्षपदी सुप्रज तारी, पंकज नाईक गावकर, पूर्वा चोडणकर, सागर मावळणकर सरचिटणीसपदी गजानन तिळवे, ओंमकार वस्त, सचिव – अंकित चणेकर, दिया गावकर, रिमा सोनुर्लीकर, खजिनदारपदी सचिन साळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किसान मोर्चा राज्य अध्यक्षपदी शंकर चोडणकर, सरचिटणीस – महेश शिलकर, उपाध्यक्ष – उदय प्रभुदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर गोवा जिल्हा सचिवपदी अरुण नाईक आणि समीर वळवईकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विभाग राज्य अध्यक्षपदी शेख जिना, सरचिटणीस – शॉन मार्टीन, उत्तर गोवा अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी मिनिनो डिक्रुज तर शर्मद रायतुरकर यांची दक्षिण गोवा जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.