प्रदर्शनीय सामन्यात खेळणार लेनिंग, मिताली, झुलन

0
98

वानखेडे मैदानावर २२ मे रोजी होणार्‍या महिलांच्या टी-२० चॅलेंज या प्रदर्शनीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग, स्टार अष्टपैलू एलिस पेरी व भारताच्या वनडे संघाची कर्णधार मिताली राज आयपीएल सुपरनोव्हा संघाकडून खेळणार आहेत. त्यांचा सामना झुलन गोस्वामी, सुझी बेट्‌स, डॅनियल हेझल यांच्या आयपीएल ट्रेलब्लेझर्स संघाशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून या सामन्याचे थेट प्रक्षेपण केेले जाणार आहे. संघ ः आयपीएल ट्रेलब्लेझर्स ः स्मृती मधाना (कर्णधार), अलिसा हिली, सुझी बेट्‌स, दीप्ती शर्मा, बेथ मूनी, जेमा रॉड्रिगीस, डॅनियल हेझल, शिखा पांडे, ली ताहुहू, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, पूनम यादव व दयालन हेमा. आयपीएल सुपरनोव्हा ः डॅनियल वायट, मिथाली राज, मेग लेनिंग, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूजा वस्राकर, मेगन शूट, राजेश्‍वरी गायकवाड, अनुजा पाटील व तानिया भाटिया.