प्रत्येक मंत्र्यांच्या मदतीला दोन अतिरिक्त अधिकारी

0
107

राज्यातील प्रत्येक मंत्र्याला दोन अतिरिक्त विशेष अधिकारी देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, सध्याच्या काळात मंत्र्यांना इत्यंभूत अशी माहिती असणे आवश्यक आहे. पण मंत्री हे तज्ज्ञ नव्हेत. त्यामुळे त्यांना आवश्यक ती माहिती पुरवणार्‍या व ती योग्य प्रकारे समजावून सांगणार्‍या अधिकार्‍यांची गरज भासत असते.
मंत्र्यांना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून झटपट आवश्यक ती माहिती देणे व सगळे काही समजावून सांगणे ही जबाबदारी या विशेष अधिकार्‍यांवर असेल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांना खात्याशी निगडीत माहिती मिळवून देण्याची व त्यांना सगळे काही समजावून सांगणे, त्यासाठी गरज भसल्यास सादरीकरण करणे अशा स्वरुपाचे काम ह्या विशेष अधिकार्‍यांचे असेल. विशेष अधिकार्‍यांकडून अशा प्रकारे झटपट माहिती मिळाली व ती व्यवस्थित त्यांना समजावून सांगण्यात आली की, मंत्र्यांची कार्यक्षमता वाढू शकेल. म्हणूनच प्रत्येक मंत्र्याला असे दोन विशेष अधिकारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले.