प्रणॉय, सायना ‘टॉप १०’मध्ये

0
66

>> दोन स्थानांच्या प्रगतीसह श्रीकांत तृतीय

एच.एस. प्रणॉय व सायना नेहवाल यांनी काल गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला आहे. चीनमधील वुहान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेती कांस्यपदकाच्या बळावर या द्वयीने ही मजल मारली आहे. प्रणॉय व नेहवाल यांनी प्रत्येकी दोन स्थानांची सुधारणा करत अनुक्रमे आठवे व दहावे स्थान प्राप्त केले आहे. प्रणॉयचे हे कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान असून सायनाने तब्बल तीन महिन्यांनंतर ‘अव्वल १०’मध्ये स्थान मिळविले आहे. पुरुष व महिला एकेरीच्या टॉप १०मध्ये भारताचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. महिला एकेरीत गोव्याची अनुरा प्रभुदेसाई ११०व्या स्थानावर आहे. तिच्या खात्यात १४,३३० गुण आहेत.

१२ एप्रिल रोजी जाहीर क्रमवारीत अव्वल स्थान मिळविलेल्या श्रीकांतने यानंतरच्या घसरणीला लगाम घालताना दोन स्थानांनी वर सरकताना तिसर्‍या क्रमांकापर्यंत सुधारणा केली आहे. श्रीकांतच्या खात्यात ७४,१३५ गुण असून प्रणॉयकडे ५७,००० गुण आहेत. ७७,५७० गुणांसह डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन पहिल्या स्थानी आहे. वुहानमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या जरानच्या केंटो मोमोटा याने पाच क्रमांकांची उडी घेत १२वे स्थान आपल्या नावे केले आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी (१८वे स्थान) भारताची सर्वोत्तम जोडी आहे. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी २६व्या तर मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा व सिक्की रेड्डी २३व्या स्थानी आहे.

टॉप १० महिला एकेरी ः १. ताय त्झू यिंग (तैवान, ८७,१०९ गुण), २. अकाने यामागुची (जपान, ८६,०३१), ३. पी.व्ही. सिंधू (भारत, ७८,८२४), ४. रात्चानोक इंतानोन (थायलंड, ७५, ४६०), ५. चेन युफेई (चीन, ६९, ४१८), ६. नोझोमी ओकुहारा (जपान, ६६, १४७), ७. कॅरोलिना मरिन (स्पेन, ६४, ८१६), ८. सुंग जी ह्यून (द. कोरिया, ६०,५९५), ९. ही बिंगिजाओ (चीन, ५९,५९९), १०. सायना नेहवाल (भारत, ५५,८९०)

टॉप १० पुरुष एकेरी ः १. व्हिक्टर एक्सेलसन (डेन्मार्क, ७७,५७०), २. सोन वान हो (द. कोरिया, ७४,६७०), ३. किदांबी श्रीकांत (भारत, ७४,१३५), ४. चेन लॉंग (चीन, ७२,०६६), ५. शी युकी (चीन, ७१,२२३), ६. चौ तिएन चेन (तैवान, ६५,५२१), ७. ली चॉंग वेई (मलेशिया, ६५,३९४), ८. एच.एस. प्रणॉय (भारत, ५७,०००), ९. एनजी का लॉंग अँगस (हॉगकॉंग, ५५,०२९), १०. लिन डान (चीन, ५४,२५६).