प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर

0
218

दिल्लीमधील आर्मी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सोमवारी त्यांची ब्रेन सर्जरी करण्यात आली होती. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनीच स्वतः ट्विट करत ही माहिती दिली होती.

प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. यामुळे डॉक्टरांना त्यांच्यावर सर्जरी करावी लागली. ही सर्जरी यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे. आपण एका दुसर्‍या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट श्री. मुखर्जी यांनी केले होते.