पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या

0
166

पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळालेले गुरुदास गावडे यांची डिचोलीचे उपअधीक्षक आणि उत्तम राऊत देसाई यांची केपेचे उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपअधीक्षक गावडे यांच्याकडे वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्यपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलीस मुख्यालयातील अधीक्षक एस. एम. प्रभुदेसाई यांनी काल जारी केला.

पोलीस खात्यातील सात उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पणजी जीएचआरसीचे उपअधीक्षक किरण पौंडवाल यांची पर्वरीचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आला आहे. पणजी एसबीचे उपअधीक्षक राजेंद्र व्ही. राऊत देसाई यांची मडगावचे उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच देसाई यांच्याकडे कोकण रेल्वेच्या उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

म्हापसाचे उपअधीक्षक महेश के. गावकर यांची फोंड्याच्या उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. फोंड्याच्या उपअधीक्षक सुनीता सावंत यांची वास्कोच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्वरीचे उपअधीक्षक शेराफीन डायस यांची म्हापसा उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केपेचे उपअधीक्षक सॅमी तावारीस यांची क्राईम ब्रँचच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एएनसी पणजी आणि एटीएस पणजीच्या उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. वास्कोचे उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा यांची एसबी – पणजीच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून कोस्टल सेक्युरिटी पणजीच्या उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. सिक्युरिटी पणजीचे उपअधीक्षक एडवीन कुलाको यांच्याकडे एमटी विभाग – पणजी आणि जेएसओसीडी – पणजी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.