पोलिसांना मोबाइल वापरण्यास निर्बंध

0
121

पोलिसांना सेवा बजावत असताना केवळ अधिकृत कामांसाठी मोबाइल फोनचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. सेवा न बजावता मोबाइलवर टाइमपास करणार्‍यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांकडून सेवा बजावत असताना मोबाइल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे आढळून आले आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कामावर असताना वैयक्तिक कामासाठी किंवा वेळ घालविण्यासाठी मोबाइल फोनचा वापर करणार्‍या पोलिसांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यात विविध ठिकाणी सेवेसाठी नियुक्त केलेले पोलीस सेवेकडे दुर्लक्ष करून मोबाइलवर जास्त प्रमाणात बोलत असल्याचे आढळून आले आहे. काही पोलीस मोबाइलवर चॅटिंग किंवा गेम्स खेळत असल्याचे नितर्शनास आले आहे. या परिपत्रकामुळे यापुढे सेवा बजावताना मोबाइलवर वेळ घालविण्याच्या पोलिसांच्या प्रकारांना चाप बसणार आहे.