पोर्तुगीज नागरिकत्वाबाबत पर्रीकरांची दिल्लीत चर्चा

0
118
दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत उपस्थित असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व अधिकारी.

गोव्यातील पोर्तुगीज नागरिक परिवारांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली.नॉर्थ ब्लॉकमध्ये झालेल्या यासंबंधी उच्चस्तरीय बैठकीस केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी तसेच केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्रमंत्रालय व गोवा सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी केंद्राला एकुण विषयाची कल्पना देऊन त्यावर तोडगा काढावा अशी मागणी केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी गृहसचिवांना या प्रकरणाचा अभ्यास करून काही उपाय निघतो का ते पाहण्यास सांगितले.
गोव्यातील सुमारे ५० हजार लोकांना दुहेरी नागरिकत्वासंबंधीचा तिढा सतावतो आहे, असे म्हटले आहे. गोवा सरकारचे म्हणणे आहे की, केंद्राने भारतीय नागरिकत्व कायद्याच्या कलम ८चा उपयोग करून हा विषय हाताळावा. परराष्ट्र खात्याने हा विषय पोतुगाल प्रशासनाकडे नेऊन मुक्तीपूर्व काळात जन्माने गोमंतकीय असलेल्यांना नागरिकत्व बहालीचे कलम वगळण्यास सांगावे, असेही गोव्याचे म्हणणे आहे.