पोटनिवडणुकांत भाजपला दणका

0
158

>> १४ पैकी केवळ दोन जागा पदरी

देशभरातल्या ९ राज्यांमधल्या १० विधानसभा आणि लोकसभेच्या ४ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचे काल जाहीर झालेले निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरले असून लोकसभेची एक व विधानसभेची एक अशा दोनच जागा भाजपला जिंकता आल्या आहेत. कर्नाटकमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर हा आणखी एक धक्का भाजपला बसल्याचे मानण्यात येत आहे.

कॉंग्रेसने चार जागा जिंकल्या असून त्यामध्ये पळूस कडेगाव, अंपती, राजराजेश्वर नगर व शाहकोटचा समावेश आहे. केरळमधल्या चेंगन्नूरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने विजय मिळवला. बिहारमध्ये जोकीघाटमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा विजय झाला. समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये नूरपूरमध्ये विजय संपादन केला. झारखंडमधल्या दोन्ही जागा जेएमएमने जिंकल्या. महेशथलाची जागा तृणमूलने जिंकली असून भाजपाला उत्तराखंडमधल्या थराळी या एकमेव जागेवर विजय मिळवता आला आहे.

तर लोकसभेच्या ४ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यातली पालघरची एक जागा भाजपाला जिंकता आली आहे. तर कैराना या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये राष्ट्रीय लोक दलाचा विजय झाला, जो योगी आदित्यनाथ यांना धक्का मानण्यात येत आहे. भंडारा गोंदिया या जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. तर नागालँडमधली जागा एनडीपीपीने जिंकली आहे.