पेडणे महाविद्यालयात ‘आयआयटी’ची व्यवस्था

0
74

पेडणे सरकारी महाविद्यालय इमारतीचा विस्तार सुरू आहे. तेथे आयटीचे वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. आयआयटी संस्थेसाठी जागा शोधण्याचे काम चालू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याबरोबर बैठक निश्‍चित झाल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
सध्या कोलवाळ येथे कमी खर्चात २५०० फ्लॅट बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन इमारतींचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेऊन तेथे आयआयटी विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती हॉस्टेल व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर प्रकल्पासाठी प्रस्ताव
गोव्यात इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचे उत्पादन करणारा प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही केंद्रासमोर आहे. आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी भारतातच वरील प्रकल्प उभारण्याचे केंद्राने ठरविले आहे, असे ते म्हणाले.दरम्यान, केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेऊन पणजी बंदराचा आयात व निर्यातीसाठी पूर्ण वापर करण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले.