पेडणे दसरोत्सवात चोख बंदोबस्त ठेवा

0
138
पेडणे येथे दसरोत्सव व कोजागिरी पौर्णिमा उत्सवात कायदा सुव्यवस्था राखून चोख बंदोबस्त ठेवावा, यावर चर्चा करताना पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर, नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर आदी.

पेडणे (न. प्र.)
पेडणे येथील प्रसिद्ध दसरा आणि सुप्रसिद्ध पुनव उत्सवात सर्व खात्याच्या अधिकार्‍यांनी चोख बंदोबस्ताबरोबरच कोणतीच भाविकांची गैरसोय होणार नाही यांची दखल घेऊन कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा महत्त्वाच्या सूचना पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी ११ रोजी पेडणे शासकीय विश्रामधाम येथे अधिकार्‍यांच्या बैठकीत केल्या.
यावेळी पेडणे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर, मामलेदार राजेश आजगावकर, वाहतूक अधिकारी पिलर्णकर, वीज साहायक अधिकारी के. व्हीलीयम, पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, ट्राफिक निरीक्षक बाव्रेकर, विविध खात्याच्या अधिकार्‍यांसोबत पेडणे नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर, उपनगराध्यक्ष प्रशांत गडेकर, माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर, माजी उपनगराध्यक्ष दीपक मांद्रेकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक गजानन सावळ देसाई, माजी जिल्हा अध्यक्ष भावू ऊर्फ पांडुरंग परब, हसापूर सरपंच संतोष मलिक, नारायण तळकटकर, वारखंड सरपंच प्रदीप कांबळी, नगरसेविका सुविधा तेली आदी उपस्थित होते. पुनवेच्या उत्सवात संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई, शहरात चार ठिकाणी मोबाईल टॉयलेट सेवा शिवाय कदंब बसस्थानकातील शौचालय सेवा त्या दिवशी कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कदंब बसस्थानकातील चारचाकी, दुचाकी वाहने पार्किंग तळ खुला करण्याची सूचना केली आहे. ट्राफिक आणि कायदा सुव्यवस्था बंदोबस्त याची पूर्ण जबाबदारी पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी घेतली. उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पेडणे पालिकेनेही आपली जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही दिली.