पेट्रोस्येनची एकहाती आघाडी

0
117

>> दुसरी गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा

गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘ए’ विभागातील आठव्या फेरीत काल रविवारी काही धक्कादायक निकालांची नोंद झाली. यानंतरही अर्मेनियाचा ग्रँडमास्टर पेट्रोस्येन मानुएल याने सात गुणांसह एकहाती आघाडी कायम राखली आहे. इतुरिझागा बोनेली एदुआर्दो, जोजुआ डेव्हिट, ल्युका पेचाझडे व झिया उर रहमान यांचे प्रत्येकी ६.५ गुण आहेत. गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील सामने ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहेत. सहाव्या विजयासह पेट्रोस्येनने आपली गुणसंख्या ७ केली असून आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा त्याचा अर्धा गुण जास्त आहे. २५ लाख रकमेच्या या स्पर्धेच्या केवळ दोन फेर्‍या शिल्लक असून स्पर्धा अधिक रंगतदार होत आहे.

गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामलला आठव्या फेरीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल श्रीवास्तवविरुद्ध अनुरागने सीसिलियन डिफेन्सच्या ‘बास्त्रिकोव व्हेरिएशन’चा वापर केला. सुरुवातीला अनुरागने सामन्यावर पकड निर्माण केली होती. परंतु, राहुलने यानंतर सामना समान स्थितीत आणल्याने ३६ चालींनंतर द्वयींनी बरोबरी मान्य केली.

अनुरागचे ५.५ गुण झाले आहेत.आंतरराष्ट्रीय मास्टर लिऑन मेंडोंसा याने फिडे मास्टर हर्षल साही याला हरवून आपली गुणसंख्या ५ केली. नीरज सारिपल्लीने शनाया मिश्राला तर नंदिनीने निर्गुण केवला हरविले. नीरजचे ४ तर नंदिनीचे ३.५ गुण झाले आहेत. आयएम गोपाळ हेगडेला नमवून देवेश नाईकने आपले गुण ४ केले आहेत. ‘सी’ गटात पाचव्या फेरीअंती गोव्याच्या आयुष पेडणेकर (नववे स्थान) अनीश नाईक (११वे स्थान), सुधीर एमके (१७वे स्थान) यांचे ४.५ तर केविन गोन्साल्विस (७३वे स्थान) व मंंदार लाड (५१वे स्थान) यांचे ४ गुण झाले आहेत.

काही महत्त्वाचे निकाल ः पी. इनियान (६) पराभूत वि. मानुएल पेट्रोस्येन (७), सामवेल टेर साखायन (६) पराभूत वि. एदुआर्दो बोनेली (६.५), अभिजीत गुप्ता (५.५) पराभूत वि. झिया उर रहमान (६.५), आलेक्झेस आलेक्झांड्रोव (६) बरोबरी वि. पेट्र कोस्तेंको (६), ऍडम तुखाएव (६) बरोबरी वि. किरिल स्तुपाक, दावित जोजुआ (६.५) वि. वि. संकल्प गुप्ता (५.५), लुका पायचाजदे (६.५) वि. वि. वॅन एनगुएन (५.५), विघ्नेश एनआर (५) पराभूत वि. पोया इदानी (६), श्याम निखिल (६) वि. नि. दीपन चक्रवर्ती (५), प्रवीण ठिपसे (५) पराभूत वि. देबाशिष