पूर्णय रायकर ठरला ‘लोहपुरुष २०१७’

0
154

गोवा वेटलिफ्टिंग असोसिएशनने गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने जुने गोवे येथे १ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या नवव्या गोवा राज्य भारोत्तोलन स्पर्धेत पूर्णय रायकर ‘लोहपुरुष २०१७’ पुरस्काराचा मानकरी ठरला. साग कांपालने सांघिक विजेतेपद तर साग म्हापसाने उपविजेतेपद प्राप्त केले. समाजकल्याण मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांच्याच हस्ते बक्षिसांचे वितरणही करण्यात आले.
निकाल ः ५६ किलो ः १. रवींद्र डायस (डीएसवायए) १२० किलो, २. देवराज कुमार (साग म्हापसा) ११७.५ किलो), ३. परेश हिरवे (साग कांपाल) ११५ किलो, ६२ किलो ः १. वरद परब (गणपत पार्सेकर कॉलेज) १६२.५ किलो, २. रामनाथ करमळकर (रायकर जिम) १६० किलो, ३. शुभम गावस (साग कुडचडे) १५५ किलो, ६९ किलो ः १. पूर्णय रायकर (रायकर जिम) २०२.५ किलो, २. चेतन गावकर (साग करमळी) १३० किलो, ३. विशाल केरकर (साग म्हापसा) ११० किलो, ७७ किलो ः १. वसंत नारुलकर (साग कांपाल) १७७.५ किलो, २. रोशन गावडे (साग म्हापसा) १७७.५ किलो), ३. पिंकेश दाभोळकर (साग म्हापसा) १७२.५ किलो, ८४ किलो ः १. महेश कवळेकर (साग म्हापसा) २०० किलो, २. रोहित चोडणकर (साग म्हापसा) १६७.५ किलो, ३. दिगंबर बोंद्रे (डीएसवायए) १५२.५ किलो, ९४ किलो ः १. किरण बेगुर (साग कांपाल) १८० किलो, २. गौरीश गावकर (साग कांपाल) १६५ किलो, ३. रोवन बोर्जिस (डीएसवायए) १३७.५ किलो, १०५ किलो ः १. दीपक फर्नांडिस (डीएसवायए) १९७.५ किलो, २. उल्हास विर्नोडकर (गणपत पार्सेकर कॉलेज) १९५ किलो, ३. सागर कारापूरकर (साग कांपाल) १८५ किलो, १०५ किलोंवरील ः १. लवू गोवेकर (साग कांपाल) १७५ किलो, २. अजिंक्य फडते (साग करमळी) १४७.५ किलो, ३. अनिकेत गोलतेकर (साग कांपाल) १३० किलो.