पूनम यादव तृतीय

0
127

>> आयसीसी टी-२० क्रमवारी

नुकत्याच संपलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेतील सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या भारताच्या पूनम यादवने काल मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे.
पूनमने या मालिकेत ९.१४च्या सरासरीने ७ बळी घेतले होते. मेगन शूट पहिल्या व ली कास्पेरेक दुसर्‍या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या अनाम अमिनने पाचवा क्रमांक राखला आहे. हेयली मॅथ्यूज चौथ्या स्थानी आहे. पूनमने बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात ९ धावांत ४ गडी बाद केले. परंतु, तिच्या या कामगिरीनंतरही भारताला विजयापासून वंचित रहावे लागले होते.

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात २२ धावांत २ गडी बाद करतानाच २३ धावा केलेल्या रुमाना अहमदने अष्टपैलूंच्या यादीत सहा क्रमांकांनी वर सरकताना १२वा क्रमांक मिळविला आहे. मालिकेतील चार डावात ५२च्या सरासरीने १५६ धावा जमवलेली भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (५७३) सातव्या स्थानी आहे. मिताली राज ५८४ गुणांसह सहावी आहे. सुझी बेट्‌स आपला पहिला क्रमांक टिकवून आहे. यानंतर मेग लेनिंग व बेथ मूनी यांचा क्रमांक लागतो. आशिया चषकातील सुमार कामगिरीनंतरही स्मृती मंधानाने आपला नववा क्रमांक राखण्यात यश मिळविले आहे.