पी.व्ही. सिंधू दुसर्‍या फेरीत

0
119

पॅरिस
फ्रेंच ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुुपर ७५० स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. महिला एकेरीत तृतीय मानांकित पी.व्ही. सिंधू हिने विजयी सलामी देताना अमेरिकेच्या बीवन झांग हिचा ३४ मिनिटांत २१-१७, २१-८ असा पराभव केला. दुसर्‍या फेरीत सिंधूचा सामना सायाका साटो व चियुंग एनगान ली यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत मात्र अर्जुन एमआर व रामचंद्रन श्‍लोक यांना द्वितीय मानांकित ली जुनहुई व लियू युचेन या चीनच्या जोडीकडून २१-१४, २१-१७ असा पराभव पत्करावा लागला.
आज बुधवारी समीर वर्मा, किदांबी श्रीकांत, साई प्रणिथ, सायना नेहवाल यांचे एकेरीत, मेघना जक्कमपुडी-पूर्विशा राम (महिला दुहेरी), मनू अत्री-सुमिथ रेड्डी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी (पुरुष दुहेरी), सात्विकसाईराज रंकीरेड्डी-अश्‍विनी पोनप्पा, रोहन कपूर- कुहू गर्ग (मिश्र दुहेरी) यांचे सामने होणार आहेत.