पिलारच्या फा. आग्नेल हायस्कूलला विजेेतेपद

0
97

‘ओएलएचईएसए’ १५ वर्षांखालील मुलांसाठीच्या अखिल गोवा आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पिलारच्या फा. आग्नेल हायस्कूलने पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी मरिना इंग्लिश हायस्कूलचा २-० असा पराभव केला.

अवर लेडी ऑफ हेल्थ हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने कुंकळ्ळी ग्रामपंचायत मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजयी संघाकडून डेल्मन रिबेलो व टोपान मिन्झ यांनी गोल नोंदविले. उपांत्य फेरीत फा. आग्नेलने माऊंट मेरी हायस्कूल चिंचणीचा ४-० असा तर मरिनाने सारझोराच्या असुम्प्टा कॉन्व्हेंटचा १-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. विजेत्या संघाने ६ हजार रुपये व करंडकाची कमाई केली तर उपविजेत्यांना ४००० हजार रुपये व चषक प्राप्त झाला.

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून फा. एडमंड बार्रेटो उपस्थित होते. त्यांनी एस्मिराल्डा मेंडीस ई फर्नांडिस यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण केले. नीरज आगियार याने सूत्रसंचालन केले तर लेस्टन डिसोझाने आभार मानले.
वैयक्तिक बक्षिसे ः स्पर्धेतील सर्वोत्तम आघाडीपटू ः नॅथन कुतिन्हो (फा. आग्नेल), सर्वोत्तम बचावपटू ः अश्‍वेक जाधव (मरिना), सर्वोत्तम गोलरक्षक ः मोहम्मद झहीर खान (फा. आग्नेल), आश्‍वासक खेळाडू ः साईश गावकर (अवर लेडी ऑफ हेल्थ), अंतिम सामन्यातील पहिला गोल ः डेल्मन रिबेलो (फा. आग्नेल), स्पर्धावीर ः ऍसमन व्हिएगस (फा. आग्नेल).