पावसाला घाबरून कॉंग्रेसचा मोर्चा रद्द

0
142

येत्या २२ रोजी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा तसेच राज्यपालांना सरकारविरुद्धचे आरोपपत्र सादर करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कॉंग्रेस प्रवक्ते शंभू भाऊ बांदेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप त्यांनी केला. टॉमेटो ६० रु. प्रती किलो, कांदा ४० रु. किलो, ओली कोथंबीरची जुडी ४० रु. असे दर केंद्रात कॉंग्रेस सत्तेवर असताना कधीच वाढले नव्हते, असा दावा त्यांनी केला. कॉंग्रेस असताना टॉमेटो रु. ४० वर तर कांदे रु. ३० वर कधीच गेले नव्हते, असे ते म्हणाले. कॉंग्रेस सत्तेवर असताना जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले की भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या मोर्चा आणत असत. आज या महिला कोठे आहेत, असा प्रश्‍न त्यांनी केला. महागाईच्या प्रश्‍नावरून कॉंग्रेस कार्यकर्ते उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर धरणे धरणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यासाठीची तारीख अद्याप निश्‍चित करण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली.