पारंपरिक युद्धाचा नवा अवतार

0
174
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

शत्रूच्या ठिकाणांवरील प्रत्यक्ष पारंपरिक आक्रमणात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सीमापारहून झालेल्या दहशतवादी कृत्यांचा बदला घेण्यासाठी सहसा सीमापार हल्ला केला जात नाही. सीमापार कारवाईसाठी क्रॉस एलओसी ङ्गायरिंगचा पर्याय अतिशय परिणामकारी आहे. पाकिस्तानने गेल्या ३० वर्षांपासून भारताविरुद्ध छेडलेले प्रछन्न युद्ध ही पारंपरिक युद्धाची पुढची पायरी असून हे युद्ध जिंकण्यासाठी भारतीय सेनेला त्याचप्रमाणे तयारी करावी लागणार आहे.

राष्ट्राच्या भौगोलिक सार्वभौमत्त्वाखालील जमिनीवरील मार्गदर्शक खुणांची नकाशावर मांडणी करून जोडणार्‍या रेषेला त्या राष्ट्राची सीमा म्हणतात. ज्यावेळी दोन शेजारी राष्ट्रांमध्ये वितुष्ट येते, पण प्रत्यक्ष युद्धाच्या भीतीने कोणीही सीमापार सैनिकी कारवाई करत नाहीत त्यावेळी सीमेवर ‘नो वॉर, नो पीस’ची स्थिती निर्माण होते. एकमेकांवर केव्हाही, कधीही, कुठेही अकस्मात अविरत गोळीबार करून त्याला जाणवेस्तोवर त्याची जीवित अथवा वित्त हानी करत युद्धजन्य परिस्थितीची निर्मिती करणे हे या परिस्थितीचे मूलभूत तत्त्व असते. भारत व पाकिस्तानमधील सीमेवर म्हणजेच लाईन ऑङ्ग कंट्रोल (एलओसी) वर हीच परिस्थिती आहे. मात्र ही केवळ युद्धजन्य परिस्थिती नसून प्रत्यक्ष युद्धाची स्थिती आहे. त्याला सक्षमरीत्या तोंड देऊन विजयी होण्यासाठी भारताला त्याच प्रकारे सज्ज व्हावे लागेल.

२०१७ च्या अखेरीस पेंटागॉन या अमेरिकन सेना मुख्यालयाने एकविसाव्या शतकातील दोन अण्वस्रधारी देशांमध्ये पारंपरिक युद्ध झाल्यास कोणती प्रतिबंधक हत्यारे, साधनसामग्री व संसाधन प्रणाली अमलात आणता येईल याच्या चाचणीसाठी आभासी युद्धाभ्यास आयोजित केला होता. त्यामध्ये सरते शेवटी अण्वस्राच्या वापराशिवाय युद्धबंदी घोषणा होईल किंवा कोणाचाही विजय शक्य नसल्यामुळे सीमेवर सतत युद्धजन्य परिस्थिती राहील, असा निष्कर्ष निघाला.

१९६० च्या दशकात सुरू झालेल्या शीतयुद्धात अमेरिका व सोव्हिएत युनियनने दोघांमधील प्रत्यक्ष युद्धाचे रुपांतर भयंकर व प्रलयंकारी आण्विक युद्धात होऊ नये यासाठी छोट्या राष्ट्रांना बाह्य प्याद्यांच्या स्वरुपात वापरून प्रच्छन्न युद्धाचा म्हणजे प्रॉक्झी वॉरचा ओनामा केला. वित्तीय संसाधनांच्या कमतरतेमुळे भारत आणि पाकिस्तान हा पर्याय स्वीकारू शकत नाहीत. तसेच हत्यारे व संसाधनांच्या कमरतेमुळे पाकिस्तानला प्रत्यक्ष युद्ध करणेही शक्य नाही. त्यामुळे त्यांनी बाह्य प्याद्यांच्या माध्यमातून भारताशी छद्म युद्ध करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. म्हणूनच जगभरातून गोळा केलेले हिंसक, भाडोत्री सैनिक आणि काश्मीरमधील व भारतातील वाट चुकलेल्या तरुणाईला आयएसआयच्या माध्यमातून हाताशी धरून प्रच्छन्न युद्धाद्वारे भारताला ‘ब्लिडिंग थ्रू थाऊजंड कटस्’ या प्रणालीद्वारे खच्ची करण्याचा पर्याय पाकिस्तानने स्वीकारला. भारतात दहशतवादी जिहादी हल्ले करून त्याच्या सेनेला व अर्धसैनिक दलांना सतत युद्धजन्य परिस्थितीचा सामना करायला लावत असतानाच सीमापार गोळीबाराच्या आडून होणार्‍या पारंपरिक युद्ध प्रणालीच्या नव्या आवृत्तीचा पर्याय पाकिस्तानने अंगिकारला.

१९६७ च्या पहिल्या अरब-इस्रायली युद्धानंतर युद्धबंदी असताना आपल्या सीमा परिघातून शत्रूराष्ट्रांवरील गोळीबाराद्वारे केल्या जाणार्‍या हानीला जगाची वैधानिक संमती प्राप्त होऊन दैनंदिन प्रशासकीय कामांत गुंतलेल्या सैनिकांवरील गोळीबारही सर्वसंमत झाला. संयुक्त राष्ट्रसंघानुसार सामान्य नागरिकांवरील हिंसक हल्ल्यांद्वारे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आल्यास मानवाधिकारांचे हनन होते आणि सीमा पार करून आक्रमण झाले तरच ते प्रकट युद्ध असते. १९६५ च्या द्वितीय भारत-पाक युद्धानंतर दोघांकडून सीमापार गोळीबाराचा ओनामा झाला; मात्र त्यामागे बहुतांश वेळा घाबरलेला टेहाळणी सैनिक, क्षुल्लक कारणास्तव गोळीबार करणारा सैनिक किंवा धडा शिकवण्यासाठी जाणूनबुजून केली जाणारी गोळीबारी असायची. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानने प्रचंड प्रमाणात सीमापार गोळीबार सुरू केला. २०१६ च्या उरी हल्ल्याच्या वेळी या ङ्गायरिंगची क्षमता शिगेला गेली.

१९९९ च्या कारगिल युद्धात भारताने याच धोरणांतर्गत सेना आणि वायूसेनेला लाईन ऑङ्ग कंट्रोल पार न करता पाकिस्तानला दणका द्यायचा आदेश दिला होता. इतकेच नव्हे तर २०१६ चा सर्जिकल स्ट्राईकही याचाच परिपाक होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येक भारतीय प्रत्युत्तराच्या वेळी पाकिस्तानने ‘भारताने जाणूनबुजून आमच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन केले’ असा कांगावा जागतिक मंचावर केला; मात्र अमेरिकेने त्यांच्या ड्रोनद्वारे पाकिस्तानच्या ङ्गाटा क्षेत्रात हद्द पार करून केलेले हवाई हल्ले किंवा भारताचा सर्जिकल स्ट्राईक हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरमधील ५१ व्या कलमानुरुप दहशतवादी तळांवरील हल्ले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सारीपाटावर ङ्गारसा हलकल्लोळ झाला नाही. याच आधारान्वये पाकिस्तानने त्यांच्या बॉर्डर ऍक्शन टीम्समार्ङ्गत सीमा पार करून भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करणे, सुट्टीवर जाणार्‍या सैनिकी वाहनांवर घात लावून मार करणे, सैनिकी चौक्यांवर दहशतवादी हल्ले करणे, लष्करी तळांमधील नागरी भागांना लक्ष्य करणे सुरू केले. याविषयी जाब विचारताच ‘आम्ही ‘बॅटस्’ना कंट्रोल करत नाही, हे आमचे काम नसून काश्मिरी स्वातंत्र्यवीरांचे आहे’ असा कांगावा पाकिस्तान करू लागला.

क्रॉस एलओसी ङ्गायरिंगद्वारे अ)सीमा पार न करता किंवा प्रत्यक्ष युद्ध न करता पारंपरिक युद्धात होणारी हानी शत्रूवर थोपवता येते. ब) आम्ही शत्रूला त्याच्या गुन्ह्याची पुरेपूर शिक्षा देत आहोत हे देशातील जनतेला सांगता वा पटवता येते. क) शहीद झालेल्या सहकार्‍यांच्या आठवणींनी हतबल, हताश झालेल्या सैनिकांचे आणि नागरिकांचे मनोबल उंचावता येते आणि ड) शत्रूवर राजकीय दबाव टाकता येतो. यामुळेच पाकिस्तानने गेल्या ३० वर्षांपासून भारताविरुद्ध छेडलेले प्रछन्न युद्ध ही पारंपरिक युद्धाची पुढची पायरी असून हे युद्ध जिंकण्यासाठी भारतीय सेनेला त्याचप्रमाणे तयारी करावी लागणार आहे.

शत्रूच्या ठिकाणांवरील प्रत्यक्ष पारंपरिक आक्रमणात मोठी जीवित हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सीमापारहून झालेल्या दहशतवादी कृत्यांचा बदला घेण्यासाठी सहसा सीमापार हल्ला केला जात नाही. सीमापार कारवाईसाठी क्रॉस एलओसी ङ्गायरिंगचा पर्याय अतिशय परिणामकारी आहे. भारतीय सेना कधीही स्पष्ट उद्देशाशिवाय किंवा शत्रूच्या खोडीला मोठी शिक्षा देणारे अकारण क्रॉस एलओसी ङ्गायरिंग करत नाही. अनुभवी, अकल्पिताचा वापर करत सर्व उपलब्ध हत्यारांचा आवर्ती व कुशल वापर करणार्‍या धडाडीच्या नेतत्वामुळे क्रॉस एलओसी ङ्गायरिंग निश्‍चितच यशस्वी होते. त्यासाठी कोणत्या हत्यारांचा प्रयोग करावा, सैनिकी ठिकाणांवर ही हत्यारे कशी उपलब्ध करता येतील, आपल्या ङ्गायरिंगनंतर शत्रूकडून देण्यात येणार्‍या प्रत्युत्तराला कसे तोंड द्यावे, त्याद्वारे होणारी जीवित व वित्त हानी किमान पातळीवर कशी आणता येईल याविषयी कोणत्याही प्रकारचा सखोल व स्पष्ट विचारविनिमय किंवा आभासी युद्धाभ्यास आपल्याकडे होताना दिसत नाही. सैनिक नेहमीच त्याच्या शत्रूवर तो बेसावध असतानाच हत्यारी वार करतो जेणेकरून कमीतकमी ङ्गायरद्वारे जास्तीत जास्त हानी झाली पाहिजे. काश्मीरमध्य पाकिस्तान हेच करत आहे. क्रॉस एलओसी ङ्गायरिंग हे नूतन पारंपरिक युद्ध आहे, याची जाणीव जनतेला आणि माध्यमांनाही झाली पाहिजे. क्रॉस एलओसी ङ्गायरिंग ही युद्धजन्य परिस्थिती नसून ही नवी युद्धप्रणाली आहे, हे जितक्या लवकर जनतेला आणि सरकारला समजेल तितक्या लवकर भारत त्यात विजयी होऊ शकेल.