पाणबुड्यांची उपयुक्तता

0
163
  • अनंत जोशी

सैनिक पाणबुडीने पहिल्या विश्वयुद्धादरम्यान आपली अद्भुत छाप उमटविली. जर्मनीच्या यू नौकांनी पहिल्या अटलांटिक युद्धादरम्यान आपली चमक दाखविली, तसेच आर.एम.एस. लुसितानिया बुडविण्यात आली. हा अनिर्बंधित पाणबुडी युद्धाचा परिणाम होता. याचमुळे अमेरीकेने या युद्धात भाग घेतला होता.

१९०१ ते १९०३ दरम्यान हॉलंड टॉर्पिडो बोट कंपनीची रीतसर परवानगी घेऊन शाही ब्रिटिश नौसेनेने हॉलंड श्रेणीतील पाच पाणबुड्या सेवेत दाखल केल्या. ज्या वेळेत त्या बांधून पूर्ण व्हायच्या होत्या, त्या वेळेत न होता त्यांसाठी बराच वेळ लागला. ६ एप्रिल १९०२ मध्ये पहिली पाणबुडी चाचणीसाठी सज्ज झाली. पाणबुडीचा संपूर्ण आराखडा एका अमेरिकेच्या कंपनीकडून विकत घेण्यात आला होता. पण जो आराखडा प्रत्यक्षात वापरण्यात आला होता, तो चाचणीविरहित होता. तसेच यामध्ये सुधारणा करून १८० अश्वशक्तीचे पेट्रोल इंजिन वापरण्यात आले होते.

अशा पाणबुडीचा पहिला वापर रशिया-जपान युद्धादरम्यान १९०४-०५ साली झाला. आर्थर बंदरात येण्या-जाण्याच्या बंदीनंतर रशियाने आपल्या पाणबुड्या लादिवोस्तोक येथे रवाना केल्या. १ जानेवारी १९०५ च्या दरम्यान रशियाकडे एकूण अशा सात पाणबुड्या होत्या. तो एक जगातील पहिला पाणबुडींचा ताफा होता. अशा या पाणबुडींच्या ताफ्यापैकी एक पाणबुडी बहुतेक करून २४ तास गस्त घालण्यासाठी सज्ज असायची. २९ एप्रिल १९०५ साली जपानशी रशियाची जेव्हा हातघाई झाली तेव्हा रशियाच्या ‘सोम’ पाणबुडीने पहिल्यांदा जपानच्या टॉर्पिडो नौकेवर हल्ला चढविला. त्यानंतर हे युद्ध संपुष्टात आले.

पहिले विश्‍वयुद्ध आणि पाणबुडी
सैनिक पाणबुडीने पहिल्या विश्वयुद्धादरम्यान आपली अद्भुत छाप उमटविली. जर्मनीच्या यू नौकांनी पहिल्या अटलांटिक युद्धादरम्यान आपली चमक दाखविली, तसेच आर.एम.एस. लुसितानिया बुडविण्यात आली. हा अनिर्बंधित पाणबुडी युद्धाचा परिणाम होता. याचमुळे अमेरीकेने या युद्धात भाग घेतला होता.
जेव्हा युद्धाची सुरुवात झाली त्यावेळेस जर्मनीकडे फक्त वीस पाणबुड्या युद्धासाठी तत्पर होत्या. यांमध्ये डिझेल इंजिन बसविलेल्या यु-१९ श्रेणीतील पाणबुड्यांचा पल्ला ५००० मैल होता. तसेच तशी ८ सागरी मैलाने त्या ब्रिटिश सागरीकिनार्‍यावर यशस्वी गस्त घालीत होत्या. याविरुद्ध शाही नौसेनेकडे एकूण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक श्रेणीतील ७४ पाणबुड्या उपलब्ध होत्या. ऑगस्ट १९१४ साली दहा यू बोटींचा ताफा हेलीगोलंड या नौसैनिक बंदरातून उत्तर समुद्रस्थित शाही नौसेनेवर चढाईसाठी रवाना झाल्या. ही इतिहासातील युद्धादरम्यान पहिली पाणबुड्यांची गस्त होती.

यू बोटीच्या सक्षमतेमुळे त्या प्रत्यक्षात युद्धातील प्रमुख घटक होत्या. तसेच नवीन युद्धनीती, त्यांची असलेली संख्या, तसेच पाणबुडीची यांत्रिकी वृद्धी जसे डिझेल, विद्युतशक्ती प्रणाली जी समयानुसार सुधारित होत गेली. खर्‍या पाणबुडीपेक्षा त्या फक्त पाण्यात बुडत होत्या. यू बोटी बहुतेक करून समुद्राच्या सतहावर, आपल्या रोजनिशीच्या इंजिनवर चालायच्या. त्या क्वचितच पाण्याखालून जायच्या. जेव्हा हल्ला करायचा असेल त्यावेळेस बॅटरीचा वापर इंजिन चालविण्यासाठी केला जाई. त्यांचा बहुतेक पुढील भागाचा आकार हा त्रिकोणी असायचा. त्याशिवाय त्यांचा पाया एका विशिष्ट तर्‍हेचा बनविण्यात आला होता, जेणेकरून समुद्रावरचे जहाजाचे हेलकावे काही प्रमाणात नियंत्रणात आणता येत होते. त्यशिवाय पुढील भाग निमुळता होत जायचा. पहिल्या विश्वयुद्धादरम्यान अलायीड सेनेच्या ५००० पेक्षा जास्त युद्धनौका या यू बोटीनी बुडविल्या होत्या.

आता पाणबुडीचे महत्त्व सर्व देशांतील नौसेनांना पटू लागले होते, त्यामुळे त्या वेळच्या तंत्रज्ञानाने प्रगत असणार्‍या देशात या तर्‍हेचे प्रयोग सुरू झाले.