पाच पर्यावरण कायद्यांचा आढावा

0
78

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने माजी कॅबिनेट सचिव टी आर एस सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या पाच पर्यावरण संबंधी कायद्यांचा आढावा घेऊन दुरुस्ती सुचविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. पर्यावरण रक्षण कायदा १९८६, वन संवर्धन कायदा १९८०, वन्यजीव रक्षण कायदा १९७२, जल प्रदुषण नियंत्रण कायदा १९७४ आणि वायू प्रदुषण नियंत्रण कायदा १९८१ या कायद्यांचा समिती आढावा घेईल. समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करेल.